कामाव्यतिरिक्त सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असणारे अभिनेते म्हणजे अविनाश नारकर. ९०च्या दशकापासून मराठी सिनेसृष्टीत सक्रिय असणारे अविनाश नारकर यांच्या अभिनयाचा प्रेक्षक वर्ग जितका जास्त आहे, तितकाच जास्त त्यांचा सोशल मीडियावरही चाहतावर्गही आहे. अविनाश यांच्याबरोबरच त्यांची पत्नी व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यादेखील सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियावर ही जोडपे कायम काहीना काही पोस्ट शेअर करत चर्चेत राहत असतात. (Avinash Narkar dance with father-in-law)
अविनाश व ऐश्वर्या नारकरही जोडी सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. अनेक ट्रेंडिंग गाणी किंवा संवादावर ही दोघे रील व्हिडीओ शेअर करत असतात आणि त्यांच्या या रील व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाड् मिळतो. कौतुकाबरोबरच दोघांना अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. मात्र अविनाश व ऐश्वर्या या ट्रोलर्सना न जुमानता फोटो व व्हिडीओ शेअर करतात. अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या वडिलांबरोबरचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अविनाश व ऐश्वर्या या एका दाक्षिणात्य गाण्यावर नाचत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
व्हिडीओमध्ये पुढे नाचता नाचता अविनाश नारकर त्यांच्या सासऱ्यांबरोबर मस्ती करु लागतात. अविनाश नाचता नाचता सासऱ्यांना टाळी देऊ लागतात आणि मग अविनाश यांचे सासरेही त्यांच्यात रमून जातात. जावई आणि सासऱ्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्सटाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला असून या व्हिडीओखाली त्यांनी असं म्हटलं आहे की, “त्यांच्याबरोबर मस्ती करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनीच खूप एन्जॉय केले”. तसंच बाबा, वडील, मुलगी असे काही हॅशटॅग्सही लिहिले आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांबरोबर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनाही आवडला आहे. तितीक्षा तावडे, अश्विनी कासार, मधुरा जोशी यांनी या व्हिडीओवर गोड, छान अशा कमेंट्स केल्या आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनीही या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.