दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सध्या खूप चर्चेत आहे. त्याने अनेक तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अनन्या पांडेबरोबर तो ‘लायगर’ या हिंदी चित्रपटामध्येही दिसून आला. विजयचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. त्याच्या अभिनयाला खूप पसंतीदेखील मिळाली आहे. मात्र विजयबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्याची चाहत्यांच्यासमोर फसगत झाली. तो चाहत्यांना भेटायला बाहेर येत असताना जिन्यावरुन पाय घसरुन खाली पडला. मात्र तो लगेच उठला आणि स्वतःला सावरलं. ही सर्व घटना कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मात्र त्याला यावेळी किती लागलं याबद्दल कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. (Vijay Deverakonda accident)
दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विजय जिना उतरताना खाली पडला. पण त्याने लगेचच स्वतःला सावरलं. अभिनेत्याच्या टीमने लगेचच त्याला उठायला मदत केली. तसेच तो लगेचच चाहत्यांना भेटण्यासाठी पुढे आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच त्याच्या चाहत्यांनी चिंतादेखील व्यक्त केली आहे. तसेच विजयचं पडणं म्हणजे इतकही काही मोठं नाही असंही अनेकजण म्हणाले आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्याचा अपघात झाला. यावेळी त्याला गंभीर दुखापतदेखील झाली होती. त्याच्या टीमने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. त्यांनी सांगितले की, “विजय सध्या फिजिओ व रिहॅब ट्रीटमेंट घेत आहे. एका फाईट सिक्वेन्सदरम्यान जखमी झाल्यानंतर त्याच्या खांद्याला दुखापत झाली. मात्र तो अजूनही त्याच्या भूमिकेसाठी सराव करत आहे. चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे”. दरम्यान आता विजयचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मात्र खूप चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान विजयच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो आजवर ‘गीतागोविंदम’, ‘डियर कॉम्रेड’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘खुशी’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द फॅमिली स्टार’, अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. आता तो अनेक नवीन भूमिकांमध्ये दिसून येऊ शकतो.