बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या अधिक चर्चेत आहे. त्याने आजवर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. नुकताच त्याचा ‘गदर २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यानंतर तो सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेला पाहायला मिळाला. मात्र तो त्याच्या खासगी आयुष्याबद्दल खूप कमी माहिती देत असतो. पण आता त्याने काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. (sunny deol fun with mom-dad)
सनीने वडील धर्मेंद्र व आई प्रकाश कौर यांच्याबरोबरचा गमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे तसेच व्हिडीओ शेअर करत खूप छान वाटत आहे असंदेखील म्हणताना दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मस्त डोंगरांमध्ये एंजॉय करताना दिसत आहे. बर्फामध्ये आईबरोबर धमाल करतानाही तो दिसत आहे. तसेच जिलेबी खात असून धर्मेंद्र ग्लासतून काहीतरी पिताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे.
सनीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “माझी प्रेरणा, निसर्गाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा”. सनीच्या या व्हिडीओवर बॉबीनेदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच इतर स्पर्धकांनीदेखील खूप प्रेम दर्शवले आहे.
सनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २०२३ साली तो चित्रपटात दिसून आला होता. अमीषा पटेल व त्याचा हा चित्रपट मागील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तो अधिक सुपरहीट ठरला होता. आता तो ‘लाहोर १९४७’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत. तसेच निर्माता आमीर खान असणार आहे. यामध्ये सनीबरोबर अभिनेत्री प्रिती झिंटादेखील दिसणार आहे. याशिवाय तो ‘बॉर्डर २’मध्येदेखील दिसणार आहे. यामध्ये दिलजित दोसांज व वरुण धवनदेखील दिसणार आहेत. ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा हा दूसरा भाग असणार आहे.