रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : गावी अमरावतीला पोहोचली Bigg Boss Marathi फेम आर्या, लेकीला पाहताच आई ढसाढसा रडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 18, 2024 | 3:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Aarya Jadhao emotional and cries seeing her mother after going to Amravati video viral

Bigg Boss Marathi 5 फेम आर्या अमरावतीला पोहोचताच आईला पाहून झाली भावुक, मायलेकींचा व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आर्या जाधवला घराबाहेर काढलं आहे. निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्याला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कॅप्टन्सी कार्यामध्ये आर्याने संयम सोडून निक्कीवर हिंसेचा प्रयोग केला. यानंतर ‘बिग बॉस’ने घरातील नियम मोडल्यामुळे आर्याला घराबाहेर काढलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर आर्याने निक्कीला ‘मी तुला मारीन’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला. (Aarya Jadhao Emotional)

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आर्या जाधव ही अमरावती शहरात दाखल झालीये. यावेळी आर्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. आर्याला भेटण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. आर्याने रॅप करत आपली एक झलक दाखवली व रॅली काढून तिचे अमरावतीकरांनी जोरदार स्वागत केले. सोशल मीडियावर याचेच अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी रॅपरची आई तिला बघून खूपच भावुक झाली होती. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर येताच आर्याला घरात वाईल्ड कार्ड म्हणून बोलावले जावे अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या होत्या. ती पुन्हा या घरात व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि याच तिच्या या घरातील वाइल्ड कार्ड एन्ट्रीबद्दल नेटकऱ्यांनी तिला शनिवारच्या इन्स्टाग्राम लाईव्हमध्येही विचारलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आधी डीपी घराबाहेर जाणार म्हटलं आता मराठी अभिनेत्याचा युटर्न, नेटकऱ्याने सुनावताच म्हणाला, “खेळ सुधारला म्हणून…”

यावेळी आर्याने नेटकऱ्यांच्या ‘वाइल्ड कार्ड म्हणून पुन्हा येणार का?’ या प्रश्नावर आर्या तुमची इच्छा असेल तर  होईल” असं उत्तर दिलं होतं. अशातच आर्याने अमरावतीमध्ये हजेरी लावल्यानंतरही उपस्थित अनेक चाहत्यांनी तिला वाइल्ड कार्ड एन्ट्रीबाबत विचारले. तेव्हाही आर्याने चाहत्यांनाच प्रश्न विचारत “तुम्हाला वाइल्ड कार्ड म्हणून मी यायला हवी आहे का?” असं म्हणाली. तसंच यावेळी आर्या आपल्या आईला भेटून खूपच भावुक झाली. दोघी एकमेकींना मिठी मारत भावुक झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss कडून घरातील गॅस वापरण्यासाठी मोजकाच वेळ, तारांबळ उडताच निक्की-वर्षा यांच्यामध्ये वाद पेटला कारण…

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा परतणार की नाही? याबद्दल अनेल चाहत्यांना साशंकता आहे. तिचे अनेक चाहते मंडळी तिला या घरात वाइल्ड कार्ड म्हणून पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आर्याने पुन्हा एन्ट्री करावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा असली तरीही ती या घरात येणारकी नाही हे येणरा काळच सांगेल.   

Tags: Aarya Jadhao and Mother Emotional VideoAarya Jadhao Emotional VideoBigg Boss Marathi 5 Fame Aarya Jadhao
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Kangana Ranut Wedding

कंगना रणौत लवकरच लग्न करणार, स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाली, "आताच लग्न करुन फायदा अन्यथा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.