अनेक कलाकार काही ना काही कारणांनी नेहमी चर्चेत असतात. या कलाकारांपैकी एक नेहमी चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत. कधी कोणत्या वक्तव्यावरुन तर कधी चित्रपटामुळे कंगना नेहमी कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे चर्चेत असते. सध्या कंगना बद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. ही चर्चा आहे कंगनाच्या लग्नाची. राजकारणात सहभाग घेतल्यापासून कंगनाला बऱ्याचदा लग्नाबाबत प्रश्न विचारला गेला. तत्पूर्वी कंगनाने या प्रश्नावर उत्तर देणे टाळले होते. मात्र कंगनाने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या लग्नाबाबत एक विधान केलं आहे. त्यामुळे कंगणाच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. या आधी राजकारणातील लोक जनशक्ती पार्टी चे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नावासह कंगनाचं नाव जोडण्यात आलं होतं. (Kangana Ranut Wedding)
कंगनाने नुकतीच न्युज 18ला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये कंगनाने लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. कंगनाला लग्नाबाबत प्रश्न विचारताच ती म्हणाली,”हो मला आता लग्न करायचे आहे. या वयातच सात फेरे घेतले तर फायदा आहे त्यानंतर लग्न करुन काही फायदा नाही”. कंगनाच्या या उत्तराने कंगना कोणाबरोबर लग्न करणार? चिराग पासवानसह सुरु असलेल्या चर्चा खऱ्या आहेत का? या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत. कंगना व चिरागच्या नावाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगली आहे. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी ही जोडी अनेकदा एकत्र पाहायला मिळाली होती.
हे देखील वाचा- Video : गावी अमरावतीला पोहोचली Bigg Boss Marathi फेम आर्या, लेकीला पाहताच आई ढसाढसा रडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल
कंगना व चिरागने २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील यांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. चिरागसह आणखी एका नावा बरोबर कंगनाची चर्चा रंगली होती ते नाव म्हणजे आदित्य पांचोली. या दोन नावांसह बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन आणि शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनसह देखील कंगनाचं नाव जोडलं गेलं होतं. ऋतिक रोशनबरोबरच्या अफेरवर खुद्द कंगनाने खुलासा केला होता. तसेच शेखर सुमनने एका मुलाखतीत कंगनाने माझ्या मुलावर काळी जादू केली आहे असा आरोप देखील केला आहे. (Kangana Ranut Wedding)
हे देखील वाचा- Bigg Boss Marathi : आधी डीपी घराबाहेर जाणार म्हटलं आता मराठी अभिनेत्याचा युटर्न, नेटकऱ्याने सुनावताच म्हणाला, “खेळ सुधारला म्हणून…”
कंगनाने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच कंगनाच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या तेजस या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तत्पूर्वी कंगनाने ”’फैशन’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘तनु वेड्स मनु’, ‘क्वीन’, ‘क्रिश 3′” या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. राजकारण व चित्रपट यांसह आता कंगना लग्नाबबत कोणता निर्णय घेणार या बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे. तर कंगणाच्या आगामी एमरजन्सी चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा पाठिंबा मिळतोय हगे पाहणं देखील रंजक ठरणार आहे.