मार्वेल (Marvel) च्या ‘डेडपूल आणि वॉल्व्हरिन’ (Deadpool & Wolverine) आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरत सिनेमॅटिक इतिहास रचला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने $1.3 अब्ज कमाईसह भारत आणि जगभरातील प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन केले. या चित्रपटाने चित्रपटगृहांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार यांची अनेक चाहते वाट पाहत होते. अशातच या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय हा चित्रपट कोणत्या ओटीटी माध्यमावर येणार? याबद्दल माहिती समोर आली आहे. (Deadpool & Wolverine OTT Release)
‘डेडपूल आणि वूल्व्हरिन’ला समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. यामुळे या चित्रपटाने जगभर प्रचंड कमाई केली. सकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतातही १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर २०२४ पासून प्राइम व्हिडिओ ऑन डिमांड (PVOD) वर उपलब्ध होईल.
डिस्नी प्लस या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि इतर भारतीय भाषांमध्ये पाहता येईल. मात्र, अद्याप याची निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. या चित्रपटाचे चाहते या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अद्याप याबद्दलची तारीख जाहीर न झाल्यामुळे अनेकजण अजून प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
आणखी वाचा – अब्दू रोजिकचे लग्न मोडलं, पाच महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा, म्हणाला, “योग्य वेळ आल्यावर…”
दरम्यान, ‘डेडपूल आणि वूल्व्हरिन’ने भारतातही दमदार कामगिरी केली. या चित्रपटाने भारतात सर्व भाषांमध्ये १३५.२२ कोटींची कमाई केली होती. जगभरातील चित्रपटाने १.३ अब्ज डॉलर्स गोळा करून आश्चर्यकारक कामगिरी केली. चित्रपटातील दोन्ही प्रमुख पात्रांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. रायन रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमन यांनी या चित्रपटात डेडपूल आणि वॉल्व्हरिनच्या भूमिका केल्या होत्या.