‘बॉलिवूडचा किंगखान’ अशी ओळख असलेला कलाकार म्हणजे अभिनेता शाहरुख खान. शाहरुखने वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘डंकी’ या चित्रपटाची खास झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी चर्चा सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वी या चित्रपटातील शाहरुखचा लुकदेखील शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून या चित्रपटाविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील ‘लूट पुट गया’ हे गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि या गाण्यालादेखील चांगलीच लोकप्रियता मिळाली. अशातच आता या चित्रपटातील ‘ओ माही’ या गाण्याचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Shah Rukh Khan On Instagram)
शाहरुखने ‘डँकी’मधील ‘ओ माही’ या दुसऱ्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या टीझरबरोबर एक पोस्टही शेअर केली आहे आणि या पोस्टद्वारे त्याने ‘डंकी’ या गाण्याचा अर्थदेखील सांगितला आहे. शाहरुखने या व्हिडीओखाली पोस्ट लिहीत असे म्हटले आहे की, “सगळेच मला डंकी या नावाबद्दल विचारत आहेत. त्यामुळे मी सर्वानाच सांगू इच्छितो की, आपल्या प्रियजणांपासून लांब राहणे आणि आणि जेव्हा ते तुमच्या बरोबर असतात. तेव्हा दिवसाच्या शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहवेसे वाटणे म्हणजे डंकी.”
यापुढे त्याने ‘ओ माही’ या गाण्याबद्दल असे म्हटले आहे की, “क्षितीजाच्या पलीकडे सूर्यास्त होण्यापूर्वी या गाण्याचा आनंद घ्या. ओ माही या गाण्याचा प्रमोशनल व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे आणि येत्या २१ डिसेंबरपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. “‘लुट पुट गया’ या प्रेमगीतातून शाहरुख व तापसी पन्नूची खास झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या गाण्यातून शाहरुख-तापसीच्या खास केमेस्ट्री चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले होते. अशातच या आगामी गाण्याची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, या गाण्यात शाहरुख खानने काळ्या रंगाचा कुर्ता घातला असून वाळवंटात तो त्याची खास पोज देतानाही दिसत आहे. तसेच या टिझरमध्ये त्याच्या मागे बॉम्बस्फोट होतानाही दिसत आहे. तसेच शाहरुख बरोबरच तापसी पन्नू व विकी कौशलच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या २१ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘पठाण’, ‘जवान’ या लोकप्रिय चित्रपटांनंतर शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटाविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.