शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सलमानची जो मदत करेल त्याचा असाच हिशोब होणार”, बिश्नोई गँगच्या व्यक्तीची ‘ती’ पोस्ट व्हायरल, म्हणाला, “भावाला मारुन…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 14, 2024 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
lawrence bishoni on salman khan

सलमान खानला पुन्हा एकदा धमकी?

सध्या सर्वत्र एनसीपी नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबद्दल सुरु आहे. या हत्येने देशभरात खळबळ उडाली असून संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. आता सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.. सलमानच्या घराबाहेर किंवा जवळ कोणतेही वाहन थांबू दिले जात नाही. याशिवाय सलमान खानचे वैयक्तिक सुरक्षा रक्षकही त्याच्या घराबाहेर तैनात आहेत. याशिवाय सलमानच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येचा संबंध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी जोडला जात आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारीही लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली असल्याचं बोललं जात आहे. (lawrence bishoni on salman khan)

अशातच आता बिश्नोई गॅंगचा शुब्बू लोणकरने फेसबुकवर एक पोस्ट केली असून ती व्हायरल झाली आहे. यामध्ये त्याने सलमान खानला उद्देशून भाष्य केले आहे. त्याने लिहिले की, “ओम जय श्री राम,जय भारत. मला आयुष्याचं मूल्य समजतं. शरीर व संपत्तीला मी धूळ समजतो. जे केलं त्याला आम्ही सत्कार्य म्हणतो आणि मैत्रीचा धर्म निभावला. सलमान खान आम्हाला ही लढाई नको हवी होती. पण तू आमच्या मित्राचं नुकसान केलंस”.

आणखी वाचा – “व्यसन करतो का?”, सूरज चव्हाणला अजित पवारांनी विचारला प्रश्न, म्हणाला, “तुम्ही ‘बिग बॉस’मध्ये पाहिलं नाहीत का?”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पुढे त्याने लिहिले की, “आज ज्या बाबा सिद्दीकीचा तुम्ही जयजयकार करत आहात तो एकेकाळी दाऊद बरोबर मोक्का कलमाखाली होता. अनुज थापन व दाऊद यांना बॉलिवूड, राजकारण व बांधकाम व्यवसायामध्ये मदत करणं यामुळे सिद्दीकीचा मृत्यू झाला. आमचे कोणाबरोबर काहीही वैर नाही. पण जो कोणी सलमान खान व दाऊद गॅंगची मदत करेल त्याचा असाच हिशोब करण्यात येईल. आमच्या कोणत्याही भावाला मारलं तर आम्ही अशीच प्रतिक्रिया देऊ”.

आणखी वाचा बच्चन कुटुंबियांबरोबर राहतच नाही ऐश्वर्या राय, ‘त्या’ व्हिडीओनंतर भांडणाचं सत्य समोर, घडलं असं काही की…
–

“याआधी आम्ही स्वतः कोणतेही वार केले नाहीत. जय श्री राम, जय भारत. शहिदांना सलाम. #lawrenceBishnoiGroup #AnmolBishmoi#ankitbhadusherewala”. दरम्यान आता या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले असून बिश्नोइ गॅंग आता काय करणार का? सलमान या सगळ्याला काय उत्तर देणार? याकडेच सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.  

Tags: bishnoi gangsalman khanviral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bollywood actresses Kriti Sanon and Kajol Devgan starrer Do Patti movie trailer released ott news see the details

क्रिती सेनॉन व काजोल देवगण यांच्या ‘दो पत्ती’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी पाहता येणार चित्रपट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.