बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. हे वृत्त खोटे निघावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल सतत काही ना काही चर्चा होताना पाहायला मिळतात. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत येते. नुकतीच अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याची पोस्ट आणि ‘केबीसी’ शोमध्ये दाखवण्यात आलेला अमिताभ यांचा वाढदिवस स्पेशल व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये बिग बींसाठी सर्वांचा मेसेज होता. पण, ऐश्वर्या राय यात दिसली नाही, ज्यावर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. (Aishwarya Abhishek Divorce Rumors)
११ ऑक्टोबर रोजी, अमिताभ बच्चन यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त, केबीसी 16′ चा एक विशेष भाग दाखवण्यात आला, ज्यामध्ये आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बींचा हा खास दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण एपिसोडमध्ये काही खास व्हिडीओ दाखवण्यात आले होते आणि या व्हिडीओमुळे बच्चन कुटुंबाने ऐश्वर्याला पूर्णपणे सोडून दिल्याच्या अफवाही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या शोमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हिडीओंमध्ये बच्चन कुटुंबातील सर्व सदस्य दिसत होते. पण ऐश्वर्या कुठेच दिसली नाही.
या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय व्यतिरिक्त घरातील इतर सर्व लोकांचा समावेश होता. जया बच्चनपासून ते अभिषेक, श्वेता आणि अगस्त्य, नव्या आणि आराध्यापर्यंत सर्वजण जुन्या आणि नवीन फोटोंमध्ये बिग बींबरोबर दिसत होते. पान या व्हिडीओमध्ये कोण दिसलं नसेल तर ती ऐश्वर्या राय. अभिषेक, श्वेता, नव्या आणि अगस्त्याने बिग बींसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्हिडिओ मेसेजही पोस्ट केले होते आणि त्यांच्यासोबत आराध्याचे काही फोटोही दाखवण्यात आले होते, मात्र संपूर्ण व्हिडिओमधून ऐश्वर्या गायब होती.
दरम्यान, या सगळ्यामुळे सोशल मीडियावर अभिषेक व ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. याबद्दल एकाने असं म्हटलं आहे की “केबीसीमध्ये सिद्ध झालं आहे. ऐश्वर्या वगळता सर्वांची झलक पाहायला मिळाली. त्यात नव्या व आराध्यादेखील बोलताना दिसत होत्या. पण ऐश्वर्याचे नाव गाव देखील नव्हते”. तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “‘कदाचित घरच्यांचा यात काही दोष नसावा, फक्त अभिषेकमुळेच हे सगळं घडत असावं”.