सध्या सर्वत्र एनसीपी नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबद्दल सुरु आहे. या हत्येने देशभरात खळबळ उडाली असून संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. आता सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.. सलमानच्या घराबाहेर किंवा जवळ कोणतेही वाहन थांबू दिले जात नाही. याशिवाय सलमान खानचे वैयक्तिक सुरक्षा रक्षकही त्याच्या घराबाहेर तैनात आहेत. याशिवाय सलमानच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येचा संबंध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी जोडला जात आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारीही लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली असल्याचं बोललं जात आहे. (lawrence bishoni on salman khan)
अशातच आता बिश्नोई गॅंगचा शुब्बू लोणकरने फेसबुकवर एक पोस्ट केली असून ती व्हायरल झाली आहे. यामध्ये त्याने सलमान खानला उद्देशून भाष्य केले आहे. त्याने लिहिले की, “ओम जय श्री राम,जय भारत. मला आयुष्याचं मूल्य समजतं. शरीर व संपत्तीला मी धूळ समजतो. जे केलं त्याला आम्ही सत्कार्य म्हणतो आणि मैत्रीचा धर्म निभावला. सलमान खान आम्हाला ही लढाई नको हवी होती. पण तू आमच्या मित्राचं नुकसान केलंस”.
पुढे त्याने लिहिले की, “आज ज्या बाबा सिद्दीकीचा तुम्ही जयजयकार करत आहात तो एकेकाळी दाऊद बरोबर मोक्का कलमाखाली होता. अनुज थापन व दाऊद यांना बॉलिवूड, राजकारण व बांधकाम व्यवसायामध्ये मदत करणं यामुळे सिद्दीकीचा मृत्यू झाला. आमचे कोणाबरोबर काहीही वैर नाही. पण जो कोणी सलमान खान व दाऊद गॅंगची मदत करेल त्याचा असाच हिशोब करण्यात येईल. आमच्या कोणत्याही भावाला मारलं तर आम्ही अशीच प्रतिक्रिया देऊ”.
“याआधी आम्ही स्वतः कोणतेही वार केले नाहीत. जय श्री राम, जय भारत. शहिदांना सलाम. #lawrenceBishnoiGroup #AnmolBishmoi#ankitbhadusherewala”. दरम्यान आता या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले असून बिश्नोइ गॅंग आता काय करणार का? सलमान या सगळ्याला काय उत्तर देणार? याकडेच सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.