रितेश देशमुख हा मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्याच्या सर्वच भूमिकांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जाते. सध्या तो ‘बिग बॉस मराठी’चा होस्ट असून एका वेगळ्याच रुपात त्याला पाहायला मिळत आहे. त्याच्या होस्टिंगचेदेखील खूप कौतुक केले जात आहे. व्यावसाईक आयुष्याबरोबरच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत असतो. तो त्याच्या कुटुंबाबरोबर अनेकदा वेळ घालवत असतो. त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील पाहायला मिळतात. (Riteish Deshmukh social media post)
रितेश त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कुटुंबियांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. आता नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक व्हिडीओ दिसून येत आहे. हा व्हिडीओ त्याची पत्नी जिनिलियाने शेअर केला आहे. यामध्ये रितेश त्याच्या भावाचा मुलगा अवानला गाणं गाताना प्रोत्साहित करताना तसेच शिट्टी वाजवतानादेखील दिसत आहे.

जिनिलियाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “या लहान मुलाने काल रात्री आमची मनं जिंकली. अवन तुझा आम्हाला खूप अभिमान वाटला. तुला तुझ्या आयुष्यात जे हवं आहे ते कर. आम्ही तुला पाठिंबा देण्यासाठी कायम असू. तसेच अभिनंदन दादा-वाहिनी तुम्ही लोक पालक असण्याचे एक सुंदर उदाहरण आहात”.
तसेच रितेशने देखील अवान गाणं गात असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, “प्रिय अवान, तू खूप अप्रतिम आहेस. तु या मंचावर गेलास आणि सगळं जिंकून घेतलंस. देशमुख कुटुंबं नेहमी तुला पाठिंबा देण्यासाठी आहेच. आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो”. रितेशच्या या व्हिडीओची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसून येत आहे.दरम्यान रितेशच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तो ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ‘हाऊसफुल ५’, ‘मस्ती ४’, ‘विस्फोट’, ‘रेड २’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.