‘ये है मोहोब्बते’ या मालिकेतून करण पटेल हा खूप प्रकाशझोतात आला. या मालिकेत त्याने रमण भल्ला ही व्यक्तीरेखा साकारली होती. तो याआधी ‘कहानी घर घर की’ या मालिकेमध्येदेखील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. तसेच त्याने ‘कसोटी जिंदगी की’, ‘कसम से’, ‘करम अपना अपना’, ‘केसर’ सारख्या अनेक सुप्रसिद्ध मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. मात्र सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या वैवाहिक आयुष्यामध्ये समस्या असल्याचे बोलले जात होते. (karan patel and ankita divorce rumours)
करण व त्याची पत्नी अंकिता भार्गव यांच्या नात्यामध्ये अडचणी येत असून लग्नाच्या नऊ वर्षानंतर दोघंही घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र आता यावर त्याची पत्नी अंकिताने खुलासा केला आहे. टेलिव्हिजन अभिनेता शार्दुल पंडितच्या पॉडकास्टमध्ये घटस्फोटाच्या चर्चावर भाष्य केले आहे. तिने म्हंटले की, “मी नुकतंच ऐकलं की आम्ही घटस्फोट घेत आहोत. हे ऐकून मला खूप हसू आले. पण माझा घटस्फोट होणार आहे याबद्दल मला आताच समजलं”.
पुढे ती म्हणाले की, “हे सगळं खोटं आहे. आम्ही अजूनही एकत्र आहोत. जर आम्ही सोशल मीडियावर आमचे रोमॅंटिक फोटो शेअर नाही करत म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्ही आता वेगळे होणार आहोत”.
दरम्यान काम्या पंजाबीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर करणने अंकिताबरोबर लग्न केले. २०१५ साली दोघंही लग्नबंधनात अडकले.लग्नाच्या नऊ वर्षानंतरही त्यांच्या नात्यामध्ये गोडवा असलेला पाहायला मिळतो. दोघांनाही एक मुलगी आहे. अनेकदा तिघांना एकत्रित स्पॉट केले जाते.‘ये है मोहोब्बते’ या मालिकेमुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेमध्ये त्याच्याबरोबर दिव्यांका त्रिपाठीदेखील होती. दिव्यांकाबरोबरचया केमेस्ट्रीला लोकांनी अधिक पसंती दर्शवली होती. या मालिकेला टीआरपी देखील अधिक होता.