बॉलीवूड व साऊथ चित्रपटांमध्ये अनेकदा झळकलेले अभिनेते प्रकाश राज नुकतेच एका ट्विटमुळे चर्चेत आले आहे. कारण, ट्विटरवर चांद्रयान-३ मोहिमेबद्दल टीका करणारा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमुळे त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र आता प्रकाश राज यांनी आणखी एक ट्विट केले आहे. पण यावेळी त्यांनी चांद्रयान-३ च्या यशस्वी ‘लँडिंग’नंतर इतिहास रचल्याबद्दल इस्रोचे व देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. (Prakash Raj Tweet)
अभिनेते प्रकाश राज नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देत असतात. अशीच एक प्रतिक्रिया त्यांनी चांद्रयान-३ मोहिमेवर काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या या ट्विटवरून त्यांना जोरदार ट्रोल करण्यात आलं होतं. शिवाय, काही लोकांकडून त्यांच्या अटकेची मागणीदेखील केली जात आहे. अशातच प्रकाश राज यांनी याच मुद्द्यावर एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मात्र, त्यांनी चांद्रयान-३ मोहिमेने इतिहास रचल्याबद्दल इसरोचे अभिनंदन केले आहे.
प्रकाश राज या ट्विटमध्ये म्हणाले, “भारतासाठी आणि देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाचा क्षण आहे. ज्यांनी ही ‘चांद्रयान-३’ मोहीम घडवून आणण्यासाठी योगदान दिले त्या इसरो व संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि आभार मानतो. ही मोहीम आम्हाला आमच्या विश्वाचे रहस्य शोधण्यात आणि साजरा करण्यासाठी मार्गदर्शन करू शकेल.”
हे देखील वाचा – Video: पावसामुळे जेव्हा शूट थांबतं…’नवा गडी नवं राज्य’ मालिकेचा BTS
PROUD MOMENT for INDIA and to Humankind.. 🙏🏿🙏🏿🙏🏿Thank you #ISRO #Chandrayaan3 #VikramLander and to everyone who contributed to make this happen .. may this guide us to Explore and Celebrate the mystery of our UNIVERSE .. #justasking
— Prakash Raj (@prakashraaj) August 23, 2023
याआधी प्रकाश राज यांनी एक फोटो शेअर करत चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवली होती. या ट्विटला प्रचंड ट्रोल झाल्यानंतर त्यांनी यावर द्वेष करणाऱ्यांना फक्त द्वेषच दिसतात, असं प्रत्युत्तर देताना नील आर्मस्ट्राँगच्या काळातील विनोदाचा संदर्भ दिला होता.
हे देखील वाचा – “मैं औरत हूँ, थी और रहुंगी”, ‘हड्डी’च्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला तृतीयपंथीयांच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकही भारावले, ट्रेलर पाहिलात का?
Hate sees only Hate.. i was referring to a joke of #Armstrong times .. celebrating our kerala Chaiwala .. which Chaiwala did the TROLLS see ?? .. if you dont get a joke then the joke is on you .. GROW UP #justasking https://t.co/NFHkqJy532
— Prakash Raj (@prakashraaj) August 21, 2023
अभिनेता प्रकाश राज यांनी हिंदीसह साऊथ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी ‘सिंघम’ चित्रपटात जयकांत शिकरे या खलनायकाची भूमिका साकारली होती. दरम्यान, इस्रोने त्यांच्या चांद्रयान-३ मोहिमेअंतर्गत बुधवारी ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुसज्ज एलएमचे सॉफ्ट लँडिंग करून अवकाशात नवा इतिहास रचला होता. यासह, चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चार देशांपैकी एक बनला आहे. (Prakash Raj Tweet on Chandrayaan-3 Mission)