गेल्या काही काळांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आधीच सुश्मिता सेनचा ‘ताली’ वेबसीरिज गाजत असताना याच विषयावर एक नवा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तो म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा ‘हड्डी’. अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपसुद्धा दिसणार आहे. (Haddi Movie Trailer)
२.२५ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसत आहे. “हमारा आशीर्वाद बहुत शक्तिशाली होता है और हमारा श्राप बहुत भयावह, और उससे भी भयावह जानते हो क्या होता है, हमारा बदला.”, या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दमदार डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते.
हे देखील वाचा – शाहरुख खानचा ‘जवान’ प्रदर्शनापूर्वीच अडचणीत, ‘त्या’ सात सीन्सवर सेन्सॉर बोर्डची कात्री
अभिनेत्याच्या चित्रपटातील या अवताराने सर्वानाच अचंबित केलं आहे. तृतीयपंथी बनलेल्या नवाजुद्दीनच्या जीवनात काय बदल झाला, पुढे गँगस्टर बनलेल्या राजकीय नेत्याचा तो बदला कसा घेतो, हे यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – “छोटीशी भूमिका तरीही…”, ‘ताली’मध्ये केलेल्या कामाबाबत रवी जाधव यांच्याकडून हेमांगी कवीचं कौतुक, म्हणाले, “तिने ज्या प्रकारे…”
या चित्रपटात नवाजुद्दीनसह अनुराग कश्यप, ईला अरुण, मोहम्मद जिशान अय्यूब, सौरभ सचदेव, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा आदी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ७ सप्टेंबरपासून ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरआधी जेव्हा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा लुक समोर आला होता, तेव्हा नेटकऱ्यांनी त्याला ओळखलेही नव्हते. पण आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते त्याला या अवतारात पाहण्यासाठी आतुरले आहे. (Nawazuddin Siddiqui Haddi trailer out)