Seema Deo Death : प्रेम करणं आणि ते टिकवणं, याचं सिनेसृष्टीतील एक उत्तम उदाहरण द्यायचं झाल्यास ज्येष्ठ अभिनेते रमेश देव व त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव ही नाव डोळ्यासमोर येतात. रमेश देव व सीमा देव यांना मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट ऑन-स्क्रीन व ऑफ-स्क्रीन जोडपं म्हणून ओळखलं जात. मराठी हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत या दोनही कलाकारांनी आपल्या अभिनयसाची छाप सोडली. मराठी चित्रपटसृष्टीत या जोडप्याने एकत्रित बरंच काम केलं, तर त्याहून अधिक काम त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत केलं.
आज दुर्दैवाने हे दोन्ही कलाकार आज आपल्यात नाहीत. पण वेळोवेळी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. अभिनयक्षेत्रामुळे ही जोडी केवळ अभिनयानेच नाही तर दोघांनीही आपल्या सदाबहार प्रेमकहाणीने लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं. रमेश देव व सीमा देव यांच्या लग्नाला ६१ वर्ष पूर्ण झाली आहेत. या जोडप्याची प्रेमकहाणी अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे.
एकत्र चित्रपटात काम करता करता हे जोडपं प्रेमात पडलं. रमेश देव हे सीमा देव यांच्याहून १२ वर्षांनी मोठे आहेत. रमेश देव न चुकता त्यांच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवशी काही ना काही भेटवस्तू देत असत. असाच एक किस्सा सीमा देव यांनी सांगितला होता. रमेश देव व सीमा देव यांच्या लग्नाला जेव्हा ५२ वर्षे पूर्ण झाली तेव्हा रमेश यांनी सीमा यांच्यासाठी हिऱ्यांच्या बांगडया भेटवस्तू म्हणून दिल्या होत्या.
त्याचा किस्सा सांगत सीमा देव म्हणाल्या, “ते मला मुंबईतील एका ज्वेलर्सच्या दुकानात घेऊन गेले. खरेदी करताना ते नेहमीच अधीर असतात. तरीही मला भेटवस्तू देण्याचा हट्ट ते नेहमीच करतात. मला महागड्या भेटवस्तू आवडत नाहीत, पण ते मला त्यावेळी भावनिकरित्या ब्लॅकमेल करत म्हणाले की, ‘काय माहीत मी उद्या तुझ्यासोबत असेन की नाही, त्यामुळे मला आज हे तुझ्यासाठी घेऊ दे”.
त्यानंतर आम्ही आमच्या मुलांसोबत जेवायला गेलो. यादरम्यान, जुने दिवस आठवत सीमा यांनी पतीकडून मिळालेल्या पहिल्या भेटवस्तूचाही खुलासा केला होता. अभिनेत्री म्हणाल्या होत्या की, “आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी त्यांनी माझ्यासाठी हिऱ्याचे कानातले आणले होते आणि मी गेले ५२ वर्ष ते कानातले वापरत आहे”.