Nava Gadi Nav Rajya BTS Video प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा मालिका महत्वाचा भाग झाल्या आहेत.मालिकेच्या माध्यमातून कलाकार घराघरात पोहोचतात. कलाकारांना मालिकेमुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते. सध्या अनेक मालिका वेगवेगळे विषय घेऊन येत आहेत. अनेक नवनवीन चेहरे मालिकांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाहायला मिळतं आहेत.इतक्या स्पर्धेत देखील काही मालिका अजूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत.(Nava Gadi Nav Rajya BTS Video)
अशीच एक मालिका म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’ कथानकापासूनच या मालिकेने आपलं वेगळंपण सुरुवातीपासून जपलं आहे. मालिकेच्या संपूर्ण स्टार कास्टला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे. राघव व आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांनी आपलंस केलं. त्यांच्यातलं हळू हळू खुलत जाणार प्रेम, रमाची मालिकेतून एक्झिट हे सर्व ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसले.
पहा ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेची पडद्यामागची धमाल (Nava Gadi Nav Rajya BTS Video)
योग्य रीतीने दर दिवशी मालिकेचा नवा भाग प्रेक्षकांपर्यंत पोहचावा म्हणून मालिकेची संपूर्ण टीम मेहनत घेत असते.विशेषतः कलाकारांची पडद्यामगची मेहनत, धमाल हे सर्व जाणून घेण्यात प्रेक्षकांना उत्सुकता असते. कथेनुसार अनेकदा कलाकरांना उन्हात, पावसात आऊटडोर शूट करावं लागत.अनेकदा कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरून शूटचे bts शेअर करत असतात.असाच एक bts व्हिडिओ आनंदी म्हणजेच पल्लवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. पावसामुळे शूट थांबलं आहे. रात्रीचे सडे नऊ वाजले आहेत व कलाकार पाऊस जाण्याची वाट पाहत आहेत.
हे देखील वाचा: ‘रात्रीस खेळ चाले’नंतर अपूर्वा नेमळेकरची नवी मालिका येणार, भूमिकेसाठी वजनही कमी केलं अन्…
सध्या मालिकेत वर्षाचं लग्न, राघव-आनंदीच्या लग्नाचा वाढदिवस असे अनेक सोहळे पाहायला मिळाले. तर अभिनेत्री आकांक्षा गाडेची मालिकेत एन्ट्री झाली आहे. आकांक्षा खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. या नव्या वळणामुळे राघव-आनंदीच्या संसारात कोणती संकट येणार हे बघणं रंजक ठरणार आहे.(nava gadi nav rajya latest update)