बॉलिवूड अभिनेता सलमान खान व शाहरुख खान यांना धमक्या मिळाल्यानंतर आता एक नवीन माहिती समोर आली आहे. आता अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनादेखील धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान येथील डॉन शाहजाद भट्टीने दुबइवरुन मिथुन यांना धमकावले आहे. तसेच त्यांनी माफी मागावी. असे न केल्यास पश्चाताप करावा लागू शकतो, असेही म्हंटले आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये शाहजादने नक्की काय सांगितले आहे? तसेच काय धमकी देण्यात आली आहे? हे आपण आता जाणून घेऊया. (Mithun Chakraborty get threat)
काही दिवसांपूर्वी, मिथुन यांनी गेल्या महिन्यात एका सभेमध्ये प्रक्षोभक भाषण दिले. त्यानंतर मिथुन यांच्या विरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. ते म्हणाले होते कि, “आज मी एक अभिनेता म्हणून नाही तर ६० व्या दशकातील मिथुन चक्रवर्ती बोलत आहे. मी रक्ताने राजकारण केले आहे त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही. कोणतं काम करुन घेण्यासाठी काय करावं हे मला बरोबर माहीत आहे. मी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यासमोर सांगत आहे की, यासाठी जे काही योग्य असेल ते मी करेन. या ठिकाणी एका नेत्याने हिंदु लोकांना कापून भागीरथीमध्ये टाकणार असे भाष्य केले होते. मला वाटलं की मुख्यमंत्री त्याला काहीतरी बोलतील पण त्यांनी काहीही केलं नाही. म्हणून मी सांगतोय की तुला तुझ्याच जमीन गाडेन”.
मिथुन यांच्या या प्रक्षोभक भाषणामुळे भट्टीला राग अनावर झाला आणि धमकीचा व्हिडीओ शेअर केला. त्याने मिथुन यांना १०-१५ दिवसांत माफी मागण्यास सांगितले. यामध्ये त्याने मिथुन यांनी मुस्लिम लोकांना कापून टाकण्याची भाषा केली असल्याचे तो म्हणाला आहे. तसेच तो व्हिडीओ शेअर करत म्हणाला की, “तुम्ही आमची मनं दुखावली आहेत. तुमचे मुस्लिम चाहतेदेखील आहेत. त्यांनीदेखील तुमचा आदर केला आहे. तुमचे चित्रपट चालले नाहीत तरीही ते आम्ही पाहिले. तुम्ही चाहत्यांमुळेच अन्न खात आहात. पण तुमच्या वयात अशा गोष्टी बोलल्या जातात त्यामुळे पश्चाताप करावा लागतो”.
पुढे तो म्हणाला की, “तुम्ही मंचावर जाऊन काहीही बोलत आहात. पण मी व्हिडीओ बनवून धमकी देत नाही. हे खरं आयुष्य आहे कोणताही चित्रपट नाही. त्यामुळे आता जी लढाई तुम्ही जिंकू शकत नाही त्याबद्दल विचार करु नका. यामुळे तुम्हाला शरमेने मान खाली घालावी लागेल”. दरम्यान आता शहजादा हा लॉरेन्स बिश्नोइचा जवळचा साथीदार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नक्की काय वळण लागणार? हे पाहण्यासारखे आहे.