बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या एका वाक्याला किंवा एखाद्या शब्दाला खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यातील एक आघाडीचे व चर्चेत राहणारे अभिनेते म्हणजे जॅकी श्रॉफ. ८० व ९० च्या दशकामध्ये जॅकी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘हिरो’, ‘राम लखन’, ‘देवदास’, ‘खलनायक’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या अभिनयाबरोबरच बोलण्याच्या वेगळ्या शैलीमुळे ते अधिक लोकप्रिय आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी जॅकी यांनी त्यांच्या खास शैलीवर आणि ‘बोल भिडू’ शब्द वापरण्यावर बंदी घातली होती. (krushna abhishek do jackie shroff mimicry)
जॅकी यांचा खास शब्द वापरावर बंधन घातली असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही सांगितले गेले. मात्र आता यासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. जॅकी यांनी कॉमेडियन कृष्णा अभिषेकला यातून सवलत दिली आहे. याबद्दल स्वतः कृष्णाने खुलासा केला आहे.कृष्णा अनेक कार्यक्रमांमध्ये कलाकारांची नक्कल करताना दिसतो. धर्मेंद्र, शाहरुख खान, जितेंद्र कपूर यांच्याबरोबरच तो जॅकी यांचीदेखील नक्कल करताना दिसायचा. मात्र जॅकी यांनी याचिका दाखल केल्यानंतर कृष्णा कधीच त्यांची नक्कल करणार नाही अशी चिंता त्यांच्या चाहत्यांना झाली. मात्र कृष्णाने स्वतः एका मुलाखतीमध्ये याबद्दल स्वतः खुलासा केला आहे.
कृष्णाने नुकताच ‘इटाइम्स’शी संपर्क साधला आहे. त्याने सांगितले की, “जॅकी यांनी स्वतः त्याला कॉल केला आणि नक्कल करण्याची परवानगी दिली”. तसेच कृष्णा हा एकमेव कलाकार असेल ज्याला जॅकी यांची नक्कल करण्याची परवानगी आहे. कारण एकदा जॅकी यांनी स्वतः कृष्णाला बोलावले आणि स्वतःची नक्कल करण्यास सांगितले होते. कृष्णाच्या नक्कल करण्याचे त्यांनी कौतुकही केले होते.
सध्या कृष्णाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमामध्ये दिसून येत आहे. याचवेळी त्याने जॅकी यांच्या मुलीसमोर त्यांची नक्कल केली होती. त्यावेळीच न्यायालयाच्या आदेशानंतरही तो जॅकी यांची नक्कल कसा काय करतो? असा प्रश्नदेखील सगळ्यांना पडला होता.