‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्य आईला बोलवायला म्हणून अहिल्या देवीच्या खोलीत येतो तेव्हा अहिल्यादेवी त्याच्याशी लग्नाबद्दल बोलतात. तितक्यात पारू सुद्धा अहिल्या देवींना चहा घेऊन आलेली असते. तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की, तुझ्या मित्राला कशी मुलगी हवी आहे हे तूच मला सांग. यावर पारू विचारते सर तुम्ही सांगा ना तुम्हाला नेमकी कशी मुलगी हवी आहे. तेव्हा अहिल्यादेवींना तो आरशासमोर उभं करतात. मला अशी मुलगी हवी आहे जी अगदी तुझी सावली आहे. तितक्यात पारू तिथे बघायला येते आणि पारू सुद्धा त्या आरशाच्या फ्रेममध्ये येते. (Paaru Serial Update)
यावर अहिल्यादेवी आपण तुझ्यासाठी अशीच मुलगी शोधू असं सांगतात. त्यानंतर सगळेजण खाली बसलेले असतात. तेव्हा अहिल्यादेवी नवीन ब्रँडच्या मार्केटिंगची जबाबदारी प्रीतम व दिशावर सोपवतात. त्यानंतर दिशा व दामिनी बोलत असतात तेव्हा दिशा ठरवते की, आता या पारूचा काटा आपल्या वाटेतून काढूनच टाकायला पाहिजे. मी माझा विचार केला होता पण ते काही झालं नाही. यावर दामिनी दिशाला भडकवते. आता हीच मी असं शूट करते ज्यामुळे पारूची चांगलीच नाचक्की होईल. त्यानंतर अहिल्यादेवी निघतच असतात. तितक्यात दिशा खाली येते आणि सांगते की, आज आपण पारूच्या नव्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी शूट करुया. यावर अहिल्यादेवी सांगतात की, आज कस जमणार.
आज तर आम्ही मिटींगसाठी जात आहोत. यावर दिशा सांगते की, मी हे सगळं काही करुन घेते. तुम्ही एकदा फक्त कास्च्युम बघून घ्या. यावर अहिल्यादेवी कॉस्च्युम बघून घेतात आणि ओके देतात. तर इकडे प्रिया तिच्या घरातून पाठवलेल्या मुलांचे फोटो पाहत असते. तितक्यात तिथं प्रीतम येतो आणि प्रीतम सांगतो की, तुम्ही मुलांचे फोटो पाहताय का यावर प्रिया सांगते की, माझ्या लग्नासाठी मुलं बघण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे घरून हे फोटो आले आहेत.
यावर प्रीतम सांगतो की, माझ्या ओळखीत एक मुलगा आहे. त्याचा फोटो दाखवू का?, असं म्हणत तो स्वतःचा फोटो प्रिया मॅडमला दाखवतो. मात्र प्रिया मॅडम हे सगळं काही मजेत घेतात आणि सांगतात की, तुम्ही सुद्धा मला खूप हसवता आणि मला ते खूप आवडतं. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात दिशा व दामिनी मिळून पारूचा कसा अपमान करणार हे सारं पाहणं रंजक ठरणार आहे.