बॉलिवूड अभिनेता अरबाज खान हा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानबरोबर लग्न केल. गेल्या वर्षात २४ डिसेंबर रोजी अर्पिता खानच्या घरी या दोघांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर जवळपास ६ वर्षांनी अरबाजने शुरा खानबरोबर त्याचा दूसरा संसार थाटला आहे. याआधी तो जॉर्जिया अँड्रियानीबरोबर रिलेशनमध्ये होता. अरबाजच्या लग्नानंतर त्याच्या एक्स गर्लफ्रेंड जॉर्जियाने त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.
जॉर्जियाने अरबाज हा खूप चांगला माणूस असून त्याच्यानंतरचे एकाकीपण मला कायम जाणवत राहील असेही म्हटले. ‘झुम’ला दिलेल्या मुलाखतीत ती असं म्हणाली की, “अरबाज हा खूप चांगला माणूस आहे. आम्ही काही कारणाने वेगळे झालो. काही गोष्टी किंवा काही माणसं सोडून देणं हे सोपं नाही, कारण तुम्ही त्या नात्यात अडकले असता. पण जेव्हा नातं संपत तेव्हा एकाला तरी नवीन वाट शोधावीच लागते”.
आणखी वाचा – Video : “दोन वाती, एक ज्योती…”, शिवानी सुर्वेचा नवऱ्यासाठी खास उखाणा, म्हणाली, “माझे पती…”
पुढे जॉर्जिया असं म्हणाली की, “सध्या मला माझे स्वातंत्र्य आवडत आहे. खरंतर, मला वाटतं स्वातंत्र्य म्हणजे आनंद. स्वातंत्र्य असलं की तुम्ही हवं ते करू शकता हवं तिथे जाऊ शकता आणि आता मला हे सर्व करायचं आहे. म्हणूनच मी आता खूप आनंदी जीवन जगत आहे”.
याचबरोबर तिने इंडस्ट्रीतील आणखी एका अभिनेत्याला डेट करण्याच्या अफवांवरही मोकळेपणाने भाष्य केले. जॉर्जियाने या अफवा असून त्यात काहीच तथ्य नसल्याचेदेखील म्हटले आहे. यादरम्यान जॉर्जियाने सलमान खानचा उल्लेख करत त्याच्या फिटनेसबद्दलही सांगितले. यावेळी ती असं म्हणाली की, “सलमान खानने मला फिटनेसचा सल्ला दिला होता. तो दिवसातून चार वेळा व्यायाम करतो, पण त्याची फिटनेस रुटीन ही खूप वेगळी आहे”.