मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Shivani Surve and Ajinkya Nanaware Wedding : लग्नासाठी अवाढव्य खर्च पण शिवानी सुर्वेच्या साध्या लूकने वेधलं लक्ष, लाल रंगाचा लेहंगाही परिधान करणं टाळलं, पाहा काही खास फोटो

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 1, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shivani Surve and Ajinkya Nanaware Wedding Updates in Marathi

Shivani Surve and Ajinkya Nanaware Wedding : लग्नासाठी अवाढव्य खर्च पण शिवानी सुर्वेच्या साध्या लूकने वेधलं लक्ष, लाल रंगाचा लेहंगाही परिधान करणं टाळलं, पाहा काही खास फोटो

Shivani Surve and Ajinkya Nanaware Marriage : अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा नुकताच शाही थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. भव्य अंदाजात व पारंपरिक अंदाजात ही जोडी लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन वाऱ्यासारखे पसरले. त्याआधी दोघांनी अखेर बंधनात असं म्हणत त्यांच्या साखरपुडा समारंभातील खास फोटोही इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले होते. या फोटोंनी दोघांच्या नात्याची जाहीर कबुली देत साऱ्यांना सुखद धक्का दिला.

शिवानी व अजिंक्य यांच्या लग्नसोहळ्यातील लूकचीही सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. दोघांच्या लग्नसमारंभातील लूकने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. लग्नसमारंभातील शिवानीच्या मॉडर्न अंदाजातील लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नासाठी शिवानीने खास गुलाबी रंगाचा डिझाइनर लेहेंगा परिधान केलेला पाहायला मिळाला. शिवाय डोक्यावर घेतलेल्या लेहेंग्यावरील दुपट्ट्याने नववधूचं लूक खुलून आलं होतं. हिरव्या बांगडया, डायमंडचे दागिने यांत शिवानी अधिकच सुंदर होती.

आणखी वाचा – Video : शिवानी सुर्वेच्या संस्कारांचं कौतुक, ज्येष्ठ मराठी अभिनेत्री येताच नवऱ्यासह मंडपातच पाया पडली अन्…; कृतीने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा स्टाइलिश कुर्ता व पायजमा घातला होता. तसेच गुलाबी रंगाच्या फेट्यामध्ये अजिंक्यचा नवरदेव खास दिसत होता. शिवानी व अजिंक्यच्या लग्नातील या लूकने साऱ्यांना भुरळ घातली. शिवानी व अजिंक्यच्या साखरपुड्यातील लूकनेही साऱ्यांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी दोघांचाही मॉडर्न अंदाज समोर आला असून या अंदाजाला असलेली पारंपरिक जोड साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होतं.

आणखी वाचा – लग्नानंतर असं आयुष्य जगत आहेत मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, मिसळ-वड्यांवर मारला ताव, म्हणाली, “जीभेचे चोचले…”

साखरपुडा समारंभानिमित्त शिवानीने यावेळी फिकट जांभळ्या रंगाची डिझाइनर साडी नेसलेली पाहायला मिळाली. तर त्यावर नाजूक असे दागिने व हातात हिरवा चुडा असा पारंपरिक लूक पाहायला मिळाला. शिवानीचा मॉडर्न आणि त्याला पारंपरिक टच असलेला फोटो लक्षवेधी ठरला तर यावेळी अजिंक्यने कुर्ता व जॅकेट परिधान केलेल पाहायला मिळालं. डोक्यावर टोपी घालत त्याचाही पारंपरिक अंदाज साऱ्यांना विशेष भावला. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी शिवानी व अजिंक्यच्या लग्नाला उपस्थिती लावत दोघांना शुभाशीर्वाद दिलेले पाहायला मिळाले.

Tags: ajinkya nanaware wedding lookshivani surveshivani surve and ajinkya nanawareshivani surve and ajinkya nanaware weddingshivani surve wedding look
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Shivani Surve took a special look at Ajinkya Nanaware video viral on social media

Video : “दोन वाती, एक ज्योती...”, शिवानी सुर्वेचा नवऱ्यासाठी खास उखाणा, म्हणाली, "माझे पती..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.