मंगळवार, जून 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

३६व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या, राहत्या घरी मृत अवस्थेत पाहिल्यानंतर…; कुटुंब हादरलं

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 22, 2025 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actor lalit manchanda suicide

प्रसिद्ध अभिनेत्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या, नक्की घडलं काय?

कलाक्षेत्रात काम करायला येणाऱ्या मंडळींच्या नशीबी स्ट्रगल काही चुकलेला नाही. बरीच मंडळी या चंदेरी दुनियेत स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. मात्र हाती निराशा आली की टोकाचं पाऊल उचलतात. काही कलाकारांनीही निराशेपोटी आपला जीव गमावला असल्याची घटना घडल्या आहेत. आता अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अभिनेता ललित मनचंदाने आत्महत्या करत स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. अवघ्या ३६व्या वर्षी ललितने जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या मृत्यूनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पण ललितने हा टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत चर्चा होताना दिसत आहेत. (actor lalit manchanda suicide)

पोलिसांच्या माहितीनुसार, राहत्या घरी ललितने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वेळीच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मात्र ललितने असं का केलं? याबाबत कोणतेच पुरावे पोलिसांच्या हाती अद्यापही मिळाले नाहीत. ललितने आजवर बॉलिवूड चित्रपट व मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या.

आणखी वाचा – चुलत भावाबरोबर शारीरिक संबंध, घाणेरडं मासिक पाहून जे केलं…; सुप्रसिद्ध गायकाचे धक्कादायक खुलासे

ललित अलिकडच्याच एका वेबसीरिजमध्ये कामही करणार होता. त्याबाबत तो उत्साही होता. ललितच्या जवळच्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, काही काळ तो मानसिक तणावामध्ये होता. तसेच खासगी समस्यांमुळे तो त्रस्त होता. ललितच्या अचानक जाण्याने कुटुंबिय, मित्र-मंडळींना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबरीने ललितचे कुटुंबिय व मित्र-मंडळींची पोलिस चौकशी करत आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं निधन, २२ वर्षांच्या संसारानंतर दोन महिन्यांपूर्वीच घटस्फोट अन्…

तपासामध्ये पोलिसांनाही काहीच हाती मिळालं नाही. शिवाय आत्महत्येपूर्वी ललितने कोणतीच चिट्ठीही लिहून ठेवलेली नाही. ललित जिथे राहत होता तेथील मंडळीही या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. मानसिक आरोग्य व नैराश्य यास कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचंही म्हणणं आहे. मानसिक आरोग्याशी दोन हात करणाऱ्यांना मदतीची गरज असते. तरच आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यास बहुदा मदत होईल.

Tags: bollywood actorbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
 India Women vs Pakistan Women
Women

भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

जून 15, 2026 | 11:40 am
urmila matondkar ex husband nikaah
Entertainment

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

जून 15, 2026 | 11:00 am
Kap Bashi Trailer
Entertainment

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

जून 15, 2026 | 9:57 am
Next Post
anurag kashyap apology to brahmin community

“ब्राम्हणांवर मूत्रविर्सजन करेन” म्हणणाऱ्या अनुराग कश्यपची हात जोडून माफी, म्हणाला, “मर्यादा ओलांडून...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.