शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं निधन, २२ वर्षांच्या संसारानंतर दोन महिन्यांपूर्वीच घटस्फोट अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 22, 2025 | 11:01 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bhabhiji ghar par hai actress Shubhangi Atre ex Husband Passed Away

'भाभीजी घर पर है' अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं निधन, दोन महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

‘भाभीजी घर पर है’ मालिकेमुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे. शुभांगी तिच्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिली. कामाबरोबरच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली. तिने २० वर्षांहून अधिक काळ संसार केला. मात्र पती पियुष पुरेसह तिने घटस्फोट घेत आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेतला. आता नवं आयुष्य जगत असताना शुभांगीसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. तिचा पूर्वाश्रमीचा पती पियुष पुरेचं निधन झालं आहे. काही काळापासून पियुष आजारी होता. त्याची आजारपणाशी सुरु असलेली झुंज अखेरीस संपली. याच संपूर्ण घटनेबाबत शुभांगीनेही भाष्य केलं आहे. (bhabhiji ghar par hai actress shubhangi atre ex husband passed away)

पूर्वाश्रमीच्या पतीचं निधन अन्…

पियुषला यकृतासंबंधित आजार होता. घटस्फोटाच्या अवघ्या अडीच महिन्यांमध्येच पियुषने जगाचा निरोप घेतला. दोन वर्षांपूर्वीच शुभांगीने पियुष व तिच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याचं सांगितलं होतं. ५ फेब्रुवारीला दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पियुष व शुभांगी एकमेकांशी बोलतही नव्हते. पण आता ती दुःखात आहे. तिने पुन्हा ‘भाभीजी घर पर है’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – “अन्न, पैशांसाठी धर्म बदलतात ते…”, ‘फ्रँड्री’मधल्या शालूचं धर्म बदलण्यावरुन पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “ख्रिस्ती कुटुंबातील…”

View this post on Instagram

A post shared by Shubhangi Atre (@shubhangiaofficial)

काय म्हणाली शुभांगी अत्रे?

शुभांगी व पियुषला १८ वर्षांची मुलगीही आहे. ती सध्या परदेशात तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. शुभांगी म्हणाली, “या कठीण काळामध्ये तुम्ही माझी विचारपूस करता आहात त्याचा मी आदर करते. पण मी तुम्हाला विनंती करते की, याबाबत बोलण्यासाठी मला थोडा वेळ द्या”. शुभांगीने नव्याने कामाला सुरुवात केली आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामधून बाहेर पडण्यासाठी तिला थोडा वेळ लागणार असल्याचं चित्र दिसतंय.

आणखी वाचा – आईनेच घराबाहेर काढलं, बाहेर कपडे फेकले आणि…; उषा नाडकर्णींनी सांगितला ‘तो’ काळ, म्हणाल्या, “बीएमसीमध्ये नोकरी करत…”

शुभांगी व पियुष यांच्या नात्यामध्ये काही वर्षांपासून दुरावा आला. मात्र लेकीसाठी दोघंही घटस्फोट घेत नव्हते. अखेरीस दोघांनी निर्णय घेत अधिकृतरित्या एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. २०व्या वर्षीच शुभांगीने लग्न केलं होतं. तिने सांगितलं होतं की, “आमच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. माझं लग्न २०व्या वर्षीच झालं. सगळं काही माझ्यासाठी सोपं नव्हतं. यापुढे मी प्रेमाला दुसरी संधी देईन असं मला वाटत नाही”. शुभांगी आता एकटीने तिचं आयुष्य जगत आहे.

Tags: bollywood newsentertainment newsmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
kanye west makes shocking confession

चुलत भावाबरोबर शारीरिक संबंध, घाणेरडं मासिक पाहून जे केलं...; सुप्रसिद्ध गायकाचे धक्कादायक खुलासे

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.