रविवार, ऑगस्ट 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 15, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
urmila matondkar ex husband nikaah

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

urmila matondkar ex husband nikaah : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्वाश्रमीचा पती मोहसिन अख्तरने दुसरं लग्न केलं आहे. उर्मिलाबरोबरच्या घटस्फोटाच्या दोन वर्षांनी त्यांनी लग्न केले. निधा भट्ट असे वधूचे नाव आहे. मोहसीन अख्तरने सोशल मीडियावर निधासोबतचे निकाहचे सुंदर फोटो शेअर केले आहेत आणि एक भावनिक नोटही लिहिली आहे. मोहसीन अख्तरला त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाले आणि यावर आनंद व्यक्त करणारी एक दीर्घ पोस्ट लिहिली. यामध्ये त्याने अल्लाह तसेच पत्नी निधा भट्टचे आभार मानले आहेत.

फोटोंसोबत उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने लिहिले, “स्वच्छ हेतू, खरे प्रेम, संयम आणि कृतज्ञतेने भरलेले हृदय. आपला आत्मा शुद्ध ठेवा, पुढे जाताना स्वतःला बरे करा आणि अल्लाहने लिहिलेले नशीब नेहमीच चांगले असते यावर विश्वास ठेवा. योग्य वेळी, अल्लाहने मला माझ्या प्रिय पत्नी निधाच्या रूपात सत्याची भेट दिली आणि माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला. तू माझे जीवन प्रकाशाने भरलेस. म्हणून धन्यवाद माझ्या प्रेमा”. मोहसीनने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “आणि मौजी, त्या जगातून माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. मला माहित आहे की हे रूप मला मिळाले आहे हे तुमच्या प्रार्थना आणि माझ्यावरील प्रेमाचे फळ आहे. आज मला माहित आहे की तुम्हाला आणखी आराम वाटत असेल. मला तुझी इतकी आठवण येते की मी कल्पनाही करू शकत नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमच्या प्रार्थनेत आम्हाला लक्षात ठेवा”.

आणखी वाचा – नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

मोहसीन अख्तर आणि उर्मिला मातोंडकर बद्दल बोलायचे तर, २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले. मोहसीन एक काश्मिरी व्यापारी आणि व्यवसायाने मॉडेल आहे. मोहसीन उर्मिलापेक्षा ९ ते १० वर्षांनी लहान होता आणि त्यामुळे त्यांचे लग्न चर्चेत होते. उर्मिला मातोंडकरने मोहसीनसोबत लग्न केल्यामुळे तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता, असा दावाही करण्यात आला होता. मात्र मोहसीनने ‘बूम लाइव्ह इन’ला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा इन्कार केला होता आणि म्हणाला होता की, “माझ्या पत्नीने इस्लाम धर्म स्वीकारला नाही. निवडणुकीपूर्वी असे दावे उधळणे ही एक सामान्य गोष्ट आहे आणि आम्हाला त्याची अजिबात पर्वा नाही”.

आणखी वाचा – संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

त्याचवेळी लग्नाच्या ८ वर्षानंतर उर्मिला मातोंडकरने मोहसीन अख्तरपासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या घटस्फोटाचे कारण उघड झाले नाही, परंतु काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की हे परस्पर संमतीने झाले नव्हते आणि दोघेही बराच काळ एकत्र राहत नव्हते. उर्मिला आणि मोहसीन यांनी कधीही त्यांच्या घटस्फोटाबद्दल उघडपणे बोलले नाही किंवा अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.

Tags: bollywood actressbollywood newsUrmila matondkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
 India Women vs Pakistan Women

भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.