रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 15, 2026 | 9:57 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kap Bashi Trailer

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, 'कप बशी' चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

Kap Bashi Trailer : गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विशिष्ट अटीमुळे चर्चेत असलेल्या “कप बशी” चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच झाला आहे. आई, मुलगा आणि होणारी सून यांच्या एव्हरग्रीन नात्याची ट्विस्टेड गोष्ट “कप बशी” या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या १९ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता ऋषी मनोहर आणि अभिनेत्री पूजा सावंत ही नवी जोडी हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने “कप बशी” या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश रामगोपाल राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा ​​​, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले असून दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांचे आहे.

“कप बशी” चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला पहिल्यांदाच सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. गुरु ठाकूर यांनी गीतलेखन, बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन तर संकलक म्हणून आशिष म्हात्रे यांनी काम पाहिले आहे . राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजक तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी लूक डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित चेहरा ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे ,उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आणखी वाचा – संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

लग्न जमण्यामध्ये पत्रिका जुळणं महत्वाचं मानलं जातं पण आताच्या आधुनिक काळात उच्च शिक्षित मुलगी जी स्वतः रेडिओ जॉकी असून होणाऱ्या नवऱ्याऐवजी त्याच्या आईशी पत्रिका जुळण्याची अट घालते. या चमत्कारिक अटीमुळे काय काय धमाल किस्से घडतात, याची मनोरंजक आणि तितकीच भावनिक गोष्ट “कप बशी” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर कथानकाची उत्सुकता वाढवणारा आहे. चित्रपटाचं नाव, टीजर, स्टारकास्ट लक्षवेधी आहे, तसेच ट्रेलरमुळे चित्रपटाच वेगळेपण नक्कीच जाणवत आहे. अनोख्या कल्पनेला उत्तम अभिनय, खुसखुशीत संवादांची जोड असल्याचं ट्रेलरमधून पाहायला मिळतं. लग्नासाठी पत्रिका पाहण्यासारख्या परंपरेतून नात्याची ट्विस्टेड गोष्ट सांगणाऱ्या “कप बशी” या चित्रपटानं उत्कंठा निर्माण केली आहे.

Tags: marathi actressmarathi movieMarathi news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
urmila matondkar ex husband nikaah

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.