बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या खूप चर्चेत आहे. सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. सध्या तिचा ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये ती पद्मा या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तिच्याबरोबर यामध्ये प्रभास,अमिताभ बच्चन, कमल हसन हे कलकार देखील दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट सोहळा पार पडला.यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारमंडळी उपस्थित राहिलेले दिसले. यादरम्याने सर्वजण गरोदर दीपिकाची काळजी घेतानाही दिसले. (deepika padukone pregnancy)
बहुचर्चित ‘कल्की…’ चित्रपट २७ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान चित्रपटाचा टिझर व ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ट्रेलरला प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळाली आहे. तसेच दीपिका व प्रभासचे चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुकही आहेत. चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटचे काही व्हिडीओ आता समोर आले आहेत. यामध्ये सगळे कलकार दीपिकाची काळजी घेताना दिसत आहेत. त्यातील एका व्हिडीओने प्रेक्षकांचे अधिकच लक्ष वेधून घेतले आहे.
सदर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दीपिका जेव्हा स्टेजवर जात असते तेव्हा राणा तिला मदत करण्यासाठी हात पुढे करतो पण त्याआधीच अमिताभ दीपिकाचा हात पकडून तिला स्टेजवर घेऊन जाताना दिसतात. तसेच जेव्हा दीपिका स्टेजवरुन खाली उतरत असते तेव्हा अमिताभ तिचा हात धरण्यासाठी पुढे जातात मात्र तितक्यात प्रभास पुढे येऊन तिला हात पकडून खाली उतरण्यास मदत करतो. तेव्हा अमिताभ प्रभासला पाठीत मारतात आणि आधी कसा दीपिकाचा हात पकडला असे विचारतात.
या चित्रपटामध्ये दीपिका गरोदर स्त्रीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे राणाने सांगितले की, “दीपिकाने आपली भूमिका कायम ठेवण्याचे ठरवले आहे”. त्यावर दीपिकाने सांगितले की, “हा चित्रपट तयार होण्यासाठी तीन वर्ष लागली. तर मी विचार केला की अजून महीने का नाही?”
दीपिका व प्रभास ही जोडी पाहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ यांच्याबरोबर दीपिका ‘पिकू’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती.