मनोरंजन विश्वात अनेक चित्रपटांची दिग्दर्शक आणि लेखन करणारे साऊथ इंडियन दिग्दर्शक सिद्दीकी यांचं दुर्दैवी निधन झाल्याचं वृत्तसमोर आलं आहे. अनेक मल्याळम चित्रपटांचं लेखन, दिग्दर्शक सिद्दीकी यांनी केलं होत. सोमवारी (८ ऑगस्ट २०२३) रोजी सकाळी हृदयविकार्याच्या झक्याने त्यांचं निधन झालं असं सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी ७ ऑगस्ट रात्री ३ वाजल्याचा सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता त्यावेळी त्यांना कोची येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. (Director Siddique Passed Away)
चित्रपटांच्या दिग्दर्शन आणि लिखानाआधी सिद्दीकी यांनी अभिनेता म्हणून आपली कारकीर्द सुरु केली.’वर्षम १६’ , ‘मनथे कोटर्मी’, ‘ मास्टरपीस’, ‘सिनेमा कंपनी’, ‘फाईव्ह स्टार हॉटेल’, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या . तसेच त्यांनी काही चित्रपटांच्या निर्मितीची धुरा देखील सांभाळली होती. १९८९ पासून त्यांची दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात झाली आणि त्यांनी ‘रामजी राव स्पिकिंग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. सिद्दीकी यांचा हा पहिलाच चित्रपट प्रचंड हिट ठरला. त्यानंतर त्यांनी कधी मागे न बघता मल्याळम सिने इंडस्ट्रीत अनेक दर्जेदार चित्रपटांचं लेखन दिग्दर्शन केलं.(Ramajo Rao Speaking)
सिद्दीकी यांनी बॉलीवूड मधील भाईजान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटाचं देखील दिग्दर्शन केलं होत.(Bodygaurd)