भारतातील श्रीमंत तसेच दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोरंजन तसेच इतर क्षेत्रातील सगळ्यांनीच श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात दु:खाचे वातावरण आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोरंजन क्षेत्रातील सर्वच कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्याबद्दलच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. अशातच आता अभिनेता अजय देवगनने देखील महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे तो अधिक चर्चेत आला आहे आणि त्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चादेखील सुरु आहे. (ajay devgan on ratan tata)
काल (बुधवारी) रात्री उशिरा रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समोर आली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. तसेच ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. अभिनेता सलमान खान, सिमी गरेवाल, प्रियांका चोप्रा, संजय दत्त, अजय देवगन यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी अजयने सोशल मीडियावर एक पोस्ट करत टाटा यांच्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
अजयने पोस्ट करत लिहिले आहे की, “जगाने एक दूरदृष्टी असणारी व्यक्ती गमावली आहे. रतन टाटा यांनी केलेले कार्य नेहमीच पुढच्या पिढ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. भारतासाठी त्यांचे योगदान हे अतुलनीय आहे. आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत. त्यांच्या आम्यास शांती लाभो, सर”.
त्यानंतर त्याचे एक सेशन होणार होते तेदेखील रद्द केले आहे. याबद्दल अजयने लिहिले आहे की, “दिवंगत रतन टाटा सर यांच्या सन्मानार्थ आम्ही ‘#AskAjay हे सेशन रद्द करत आहोत. हे सेशन पुढे कधी होणार याबद्दल लवकरच माहिती दिली जाईल”. दरम्यान अजयने जे पाऊल उचलले त्याबद्दल सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे.