सध्या काही दर्जेदार हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यामध्ये अक्षय कुमारचा ‘बडे मिया छोटे मिया’ व अजय देवगणचा ‘मैदान’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. अजयचा खेळावर आधारित असलेल्या चित्रपटाने अधिक लोकप्रियता मिळवली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून या कमाईचे आकडे समोर आले आहेत. अजय या चित्रपटामध्ये एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाने काय कमाल केली आहे आणि प्रेक्षकांनी किती पसंती दर्शवली आहे ते जाणून घेऊया. (maidaan movie collection)
अजयच्या ‘मैदान’ला प्रेक्षकांचा व समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अनेक कलाकारांनी व दर्शकांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. तसेच प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी देखील सोशल मिडियावर अजयचे व त्याच्या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगले प्रदर्शन केले असून पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅकनिल्क’ च्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अजयने या चित्रपटांमध्ये देशातील प्रसिद्ध प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फुटबॉलसाठी समर्पित केले होते आणि भारताला गौरस्पद विजय मिळवून दिला होता. या चित्रपटांमध्ये अजयबरोबर प्रियमणि, गजराजराव व बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच या चित्रपटाला ए.आर.रहमान यांनी संगीत दिले आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अमित रविंद्रनाथ शर्माने सांभाळली. तसेच बोनी कपूर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाआधी मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात ‘शैतान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.२१ कोटी रुपयांची कमाई केली होती.