मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्याच्या पाया पडण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 12, 2024 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rupali ganguly on airport video

नवऱ्याच्या पाया पडण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, "ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि..."

सध्या टेलिव्हिजनवर ‘अनुपमा’ या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. जवळपास ५०% लोक ही मालिका पाहतात. या मालिकेचा टीआरपीदेखील प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी  प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. यातील मुख्य पात्र अनुपमा म्हणजे रुपाली गांगुलीने आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकेतील तिच्या संवादाने तिच्या लोकप्रियतेमध्ये अधिकच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पण काही दिवसांपूर्वी रुपाली खूप चर्चेत आली होती. त्यावरुन तिच्याबद्दल सर्वच स्तरामध्ये चर्चा सुरु झाली होती. आता त्यावर खुद्द रुपालीने मौन सोडले असून त्यामागची कारणे सांगितली आहेत. (rupali ganguly on airport video)

काही दिवसांपूर्वी रुपालीचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती तिच्या पतीच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेताना दिसत आहे. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर तिच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी दर्शवली. मालिकेमध्ये महिला सक्षमीकरणाबद्दल सांगून, महिलांबद्दल आदर अशा गोष्टी सांगणारी अनुपमा खऱ्या आयुष्यामध्ये एकदम विरुद्ध आहे. या टीकेवर आता अनुपमाने चाहत्यांना उत्तर दिले आहे.

आणखी वाचा – “घराचं भाडं देण्यासाठीही…”, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याला भोगावा लागला त्रास, म्हणाला, “माझे जेवण कुत्र्यांना द्यायचो आणि…”

View this post on Instagram

A post shared by Ashwin K Verma (@ashwinkverma)

त्याबद्दल तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “माझे पती आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम आहेत. ते असताना मला काम करण्याची काहीही गरज नाही. ते आमचा सगळ्यांचा खूप चांगला सांभाळ करु शकतात. पण असे असतानादेखील त्यांनी मला या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी दिली तसेच मला प्रेरणादेखील दिली. ते आमच्या घराचे मुख्य आहेत. त्यामुळे मी नेहमीच त्यांच्या पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेते”.

आणखी वाचा – “बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या…”, हेमंत ढोमेच्या पोस्टवर बायकोने दिलं उत्तर, क्षितीच्या कमेंटने वेधलं लक्ष, म्हणाली, “हट्ट पुरवायचे…”

पुढे ती म्हणाली की, “आमचे कितीही भांडण झाले तरीही मी दुसऱ्या दिवशी उठून त्यांच्या पाया पडते. मी त्यांचा खूप आदर करते आणि त्यांच्याव खूप प्रेमदेखील करते”.

रुपालीने २००० साली ‘सुकन्या’ या मालिकेतून मालिकाविश्वामध्ये पदार्पण केले. तसेच तिने ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या सुप्रसिद्ध मालिकेतील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. दरम्यान ती आता ‘अनुपमा’च्या माध्यमातून तिला खूप प्रसिद्धी मिळत आहे.

Tags: airport videoanupamarupali ganaguli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Virat Kohli Hardik Pandya Video

Video : हार्दिक पांड्याला ट्रोल करणाऱ्यांना विराट कोहलीची समज, सामना सुरु असताना केलेल्या 'त्या' कृतीचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.