मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इतर मुलींसारखी मी नाही”, बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव सांगताना नोरा फतेहीचं मोठं विधान, म्हणाली, “कामाची गरज म्हणून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 12, 2024 | 12:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nora Fatehi On Film Industry

"इतर मुलींसारखी मी नाही", बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव सांगताना नोरा फतेहीचं मोठं विधान, म्हणाली, "कामाची गरज म्हणून..."

अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या नृत्याने व अदाकारीने सिनेविश्वात स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. अनेकदा नोरा तिच्या नृत्यामुळे व लूकमुळे चर्चेत असते. नोराचा डान्स लोकांना खूप आवडतो. अशातच आता नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चित्रपटसृष्टीत तिच्याबरोबर झालेल्या वाईट वागणुकीबद्दल नोराने केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. नोराने केलेलं भाष्य ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. (Nora Fatehi On Film Industry)

नोरा फतेहीने नुकतीच रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलताना तिने चित्रपट जगतातील लोकांनी केलेल्या अपमानाबद्दल खुलेपणाने भाष्य केलं. नोराने नुकतीच दिलेली ही मुलाखत सध्या सर्वत्र पसरली आहे. कारण नोराने यावेळी केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. नोराने यावेळी सांगितलं की, “कधीकधी तिला अशा लोकांचा सामना करावा लागतो ज्यामुळे तिला विचित्र वाटते”. यामागचे कारण स्पष्ट करताना ती म्हणाली की, “त्या लोकांचा हेतू योग्य नाही”.

आणखी वाचा – रोहिणी हट्टंगडींना विमानप्रवासादरम्यान मिळाल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, खास सरप्राइज मिळताच हात जोडून नमस्कार केला अन्…

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा फतेहीने पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, “ती अनेकदा स्वत:बरोबर असं होताना पाहते. अलीकडे त्याला पुन्हा अशीच वागणूक मिळाली आहे. काही लोकांना हे समजत नाही. लोकांना आश्चर्य वाटते की, ही मुलगी इथे कशी आली?, आमची मुलगी का येऊ शकली नाही?, यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप असल्याचे तिने यावेळी सांगितले. नोराने स्वतःबद्दल असंही सांगितले की, ‘ती इतर मुलींसारखी नाही, जी पुरुष कलाकारांसमोर नम्रपणे बोलेल’.

आणखी वाचा – “बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या…”, हेमंत ढोमेच्या पोस्टवर बायकोने दिलं उत्तर, क्षितीच्या कमेंटने वेधलं लक्ष, म्हणाली, “हट्ट पुरवायचे…”

नोरा म्हणाली की, “जर मला वाटत असेल की काहीतरी चुकीचे आहे, तर मी त्याबद्दल नक्कीच बोलेन. काही लोकांना ते आवडत नाही. काही लोकांना अशा मुली आवडतात, ज्या शांत, सभ्य असतात. तर काही त्यांना कामाची गरज असल्यासारखं दाखवतात. अशा मुलींसारखं माझं नाही आहे ज्या दुबळेपणाचा आव आणतात. आणि कोणालाही असं करण्याचा अधिकार नाही. ही मुलगी सिनेसृष्टीत काय काम करत आहे. ही मुलगी फिल्मी दुनियेत का आहे?, इथे हिचं काम करण्याचं काही खास कारण नाही”.

Tags: bollywood actressentertainmentnora fatehiNora Fatehi On Film Industry
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
rupali ganguly on airport video

नवऱ्याच्या पाया पडण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, "ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.