बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नुकतीच (३ जानेवारी) रोजी तिचा बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकली. साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला असून घरच्या काही मोजक्या कुटुंबियांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. आयरा आणि नूपुरने नोंदणी पद्धतीने लग्न केले असून येत्या ८ जानेवारीला उदयपूर येथे शाही पद्धतीने त्यांचा पुन्हा एकदा विवाहसोहळा पार पडणार आहे. तर १३ जानेवारीला मुंबई मधील जिओ वर्ल्ड येथे त्यांच्या लग्नाचा भव्य रिसेप्शन सोहळाही पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. (Ira Khan And Nupur Shikhare Wedding)
आयरा-नुपूर येत्या ८ जानेवारीला उदयपूरच्या ताज आरवली हॉटेलमध्ये शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. आयराच्या शाही लग्नासाठी आमिरने हॉटेल ताज अरावलीमध्ये १७६ खोल्या बुक केल्या आहेत. तसेच या लग्नाला जवळपास २५० पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या लग्नासाठी अनेक बड्या कलाकारांची हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ७ जानेवारीपासूनच पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यांच्या लग्नाचा हा थाट १० तारखेपर्यंत चालणार आहे. लेकीच्या लग्नाची सर्व तयारी व व्यवस्था करण्यासाठी आमिर ५ जानेवारीला उदयपूरसाठी रवाना होणार आहे.
नूपुरने त्याच्या लग्नात तब्बल ७ किलोमीटर धावत जात हजेरी लावली. स्वत:च्या लग्नात नूपुरने शॉर्ट पॅंट व बनियनमध्ये हजेरी लावली होती. तर आयरानेही आयरा खानने लग्नात धोती चोली असा हटके ड्रेस परिधान केला होता. तसेच तिने या ड्रेसवर कोल्हापुरी चप्पल घातली होती. दोघांचा साधा लूक पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. तर काहींनी त्यांच्या साधेपणाचं कौतुकही केलं. आमिर मात्र लेकीच्या लग्नात खास लूक केला होता. आमिर लेकीच्या लग्नात कुर्ता धोतर व त्यावर मराठमोळ्या फेट्यामध्ये पाहायला मिळाला.
आणखी वाचा – “तू जास्तचं भोगलं आहेस अन्…”, केदार शिंदेंची बायकोसाठी भावुक पोस्ट, “माझ्या आयुष्यात येणं ही…”
दरम्यान, आयरा-नूपुर यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी काही आहेर न आणण्याचा नियम करण्यात आला आहे. आयरा-नुपूरच्या यांच्या या नियमामागे एक सुंदर विचार आहे. तो म्हणजे भेटवस्तूंऐवजी पाहुण्यांनी त्यांच्या संस्थेला देणगी देण्याची विनंती केली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, आयराने लग्नात भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला असून पाहुण्यांना भेटवस्तूंऐवजी आशीर्वाद व आगत्सू फाउंडेशनला देणगी द्यावी असे म्हटले आहे.