बॉलिवूड अभिनेता अमिर खान सध्या खूप चर्चेत असलेला बघायला मिळतो. आजवर तो अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसला आहे. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेदेखील तो अधिक चर्चेत राहिला आहे. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेली बघायला मिळाली. किरणने दिग्दर्शित केलेला चित्रपट ’लापता लेडीज’ हा मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला. य चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळाली. नुकतेच तिने तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. २०१० साली किरणचा पहिलाच दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘धोबी घाट’ या चित्रपटाबद्दल नुकतेच तिने भाष्य केले आहे. यामध्ये ती आमीरबरोबर काम करत होती. यावेळचे तिने खास प्रसंग शेअर केला आहे. (kiran rao on amir khan)
किरणने नुकताच फिल्मफेअरशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली की, “हा खूप कमी बजेटचा चित्रपट होता. मनात एक भीती होती. मला जे करायचं आहे ते मी करु शकेन की नाही? हा विचार सारखा मनात येत असे. मी खूप धैर्याने सगळं करत होते. मी कोणावरही ओरडू शकत नव्हते. मात्र आमिरवर मी चिडायचे. ओरडू शकत होते”.
पुढे ती म्हणाली की, “त्यावेळी चित्रीकरणाच्या एक दिवस आधी आमिरने मला म्हणाला की मी सध्या तुझा पती किंवा चित्रपट निर्माता नाही. त्यामुळे इतर कलाकारांशी जसा व्यवहार करतेस तसंच माझ्याशी वाग. त्यावेळी मला माझी चूक समजली आणि त्यासाठी माफी मागितली”. ‘धोबी घाट’ हा किरणने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये प्रतीक बब्बर, मोनिका डोगरा, कृती मल्होत्रा व आमिर खान मुख्य भूमिकेत होते.
किरण व अमिरने २००५ साली लग्न केले. त्यानंतर एकमेकांबरोबर मतभेद झाल्यामुळे २०२१ साली घटस्फोट घेतला. पण घटस्फोट झाल्यानंतरही दोघे एकमेकांवर प्रेम करत असल्याचे सांगतात. अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र एंजॉय करतानादेखील दिसतात. त्यांचे एकत्रित असे अनेक फोटो व व्हिडीओ समोर येताना दिसतात.