ओटीटीवरील सगळ्यांची लोकप्रिय सीरिज म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी हा मुख्य भूमिकेत दिसून आला होता. याबरोबरच यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणीदेखील दिसून आली होती. याबरोबरच ती शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटातदेखील दिसून आली होती. मात्र अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. या सततच्या ट्रोलिंगवर प्रियमणीने भाष्य केले आहे. अनेकदा तिला तिच्या त्वचेच्या रंगावरुन हिनवण्यात आलं आहे. तसेच तिला ‘म्हातारी’ व ‘काळी’ देखील म्हंटले आहे. यावरुन आता ऑनलाइन ट्रोलिंगवरुन अभिनेत्रीने दिलखुलासपणे भाष्य केले आहे. ती नक्की काय म्हणाली? हे आपण आता जाणून घेऊया. (priyamani on trollers)
प्रियमणीने एकदा ‘बॉलिवूड बबल’बरोबर संवाद साधला होता. यावेळी तिने मेकअप न करता काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावेळी अनेकांनी तिला मेकअप न करता खूप छान दिसत असल्याचे सांगितले होते. मात्र काहीनी तिला काकूबाईसारखी दिसत असल्याचे सांगितले. यावरुन आता प्रियमणीने सगळ्यांना उत्तर दिले होते. ती ट्रॉलर्सना म्हणाली की, “मग काय झालं. आज नाहीतर उद्या तूपण काकूबाई होणारच आहेस. मी आता 38 वर्षाची आहे पण मी आजही हॉट आहे. तोंड बंद करा”.
पुढे ती म्हणाली की, “मला वाटतं की तुम्हाला खुश ठेवण्यासाठी मी स्वतःला का बदलू? ही मी आहे. मी जशी आहे तशी आहे. मी खूप सुखी आहे”. तसेच नकारात्मक प्रतिक्रियांमुळे खूप त्रास होत असल्याचेही तिने सांगितले आहे. तसेच लोकांनी आता मोठं व्हावं आणि आयुष्य हे तिचं आहे आणि आई-वडील व होणाऱ्या नवऱ्याला सोडून कोणालाही उत्तर देण्यासाठी बांधील नसल्याचेही तिने सांगितले. रेडिटवर एका युजरने उत्तर देण्यासाठी तिला पाठिंबा दिला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “तिच्यासाठी खूप चांगलं आहे. ट्रोलिंगला इतकं चांगलं उत्तर देताना बघून बरं वाटलं”.
यानंतर अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “ठीक आहे ती चुकीची नाही. ती हॉट आहे. मला माफ करा”. दरम्यान आता प्रियमणीची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटामध्ये ती शाहरुख खानबरोबर ‘वन टू थ्री…’ या गाण्यात दिसून आली होती. शाहरुखबरोबरचा ‘जवान’ हा चित्रपटदेखील खूप सुपरहिट ठरला.