टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ गेली अनेक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. या मालिकेतील ‘सोनू’ ही भूमिकादेखील खूप लोकप्रिय ठरली. ही भूमिका झील मेहताने साकारली होती. काही दिवसांपूर्वीच ती लग्नबंधनात अडकली आहे. नुकतीच ती एका पॉडकास्टमध्ये हजर राहिली होती. यावेळी तिने मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे. तिच्या मते तो एक मोठा धक्का होता आणि समोर जे काही झालं ते बघून तिच्या स्वतःच्या निवड व निर्णयांवर संशय घेऊ लागल्याचे तिने संगीतले. ती नक्की काय म्हणाली? जाणून घेऊया. (jheel mehta on taarak mehta ka oolta chashma)
झील सिद्धेश लोकरेच्या पॉडकास्टमध्ये हजर राहिली होती. यावेळी तिने पहिला सीन चित्रित करताना काय झाले याबद्दल तिने सांगितले. ती म्हणाली की, “पहिल्या सीनमध्ये टप्पू क्रिकेट खेळत होता आणि मी बाल्कनीमध्ये येऊन हेलो करणार होते. याआधी आम्ही बोरिवली येथील एका सोसायटीमध्ये पायलट एपिसोड चित्रित केला होता. ती सोसायटी पूर्ण बंद करण्यात आली होती. मात्र यावेळी असं काही झालं ज्याचा परिणाम माझ्यावर खूप झाला”.
पुढे ती म्हणाली की, “टप्पूच्या लग्नाचा जो एपिसोड होता तो माझ्यासाठी खूप कठीण होता. मी एवढा का विचार करत होते हे मला समजलं नाही. तो फक्त एक बालविवाह होता. मला माहीत नाही माझ्या डोक्यात काय काय चालू होतं ते. पण मी जेव्हा एपिसोड बघितला तेव्हा कळलं की हे स्वप्न होतं. माझ्यासाठी हे खूप मजेशीर होतं. मी माझ्याच निवडीवर प्रश्न उपस्थित करत होते”.
झीलणए २०१२ साली या मालिकेतून काढता पाय घेतला. शिक्षणासाठी तिने अभिनय क्षेत्राला रामराम केल्याचेही समोर आले होते. मात्र आता ती मेकअप आर्टिस्ट असून एक यशस्वी उद्योजिका आहे. नुकतीच ती आदित्य दुबेबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यांचा साखरपुडा जानेवारी २०२४ मध्ये झाला होता आणि त्याचवर्षी डिसेंबरमध्ये ते लग्नबंधनात अडकले.