मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासूबाईंचं हृता दुर्गुळेवर आहे जीवापाड प्रेम, सून व लेकाचा रोमॅंटिक व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तुम्ही दोघं…”   

Saurabh Moreby Saurabh More
मे 18, 2024 | 3:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hruta Durgule's mother-in-law wished Hruta and Prateek Shah on their second wedding anniversary.

सासूबाईंचं हृता दुर्गुळेवर आहे जीवापाड प्रेम, सून व लेकाचा रोमॅंटिक व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तुम्ही दोघं...”

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हृताने ‘दुर्वा’ व ‘फुलपाखरू’ या मालिकांमधून प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. त्यानंतर तिने मराठी नाटकांकडे आपला मोर्चा वळवला. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ सारखं नाटक केल्यानंतर तिने ‘अनन्या’, ‘टाइमपास ३’, सर्किट’सारख्या चित्रपटांद्वारे अभिनय करत परेजकक्षकांचे मनोरंजन केले. अभिनेत्री दोन वर्षांपूर्वी निर्माता व अभिनेता प्रतीक शाहबरोबर विवाहबंधनात अडकली.

१८ मे २०२२ रोजी हृता व प्रतीक यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आणि आज त्यांच्या लग्नाला २ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या लग्नाला २ वर्षे पूर्ण होताच हृताने सोशल मीडियावर त्यांचा एक रोमॅंटिक फोटो शेअर करत नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. “मिस्टर शाह लग्नाच्या वाढदिसानिमित्त शुभेच्छा आणि माझ्या आयुष्यात आपण असल्याबद्दल धन्यवाद” असं म्हणत तिने शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

आणखी वाचा – घरी परतल्यानंतर ‘तारक मेहता…’ फेम सोढीचा पहिला फोटो समोर, अशी झाली आहे अवस्था, ओळखणंही कठीण, वडील म्हणाले, “त्याचे अपहरण…”

तर प्रतीकनेदेखील लग्नाच्या वाढदिसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. हृताबरोबरचा एक खास व्हिडीओ शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. २ वर्षे आपला वेडेपेणा, आनंद व उत्सव एकत्र साजरे केल्याचे कौतुक” तसेच यापुढे त्याने “या व्हिडीओमध्ये आम्ही आमची गेली दोन वर्षे कशी घालवली आहेत हे दाखवले आहे आणि आमची पुढची सर्व वर्षे अशीच जावीत अशी मी प्रार्थना करतो” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – “ज्यांची लायकी नाही त्यांनी…”, ट्रोल करणाऱ्यांना आनंद इंगळेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले, “माझ्यावर त्यांनी का बोलावं?”

या व्हिडीओवर प्रतीकची आई व हृताची सासू मुग्धा शाह यांनीही कमेंट्स करत दोघांना त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. देवाचे कायम तुमच्यावर आशीर्वाद राहो” असं म्हणत त्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, या व्हिडीओला हृता व प्रतीक यांच्या चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे व दोघांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.      

Tags: hruta durgulemarathi entertainment newsprateek shah
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Tula Shikvin Changalach Dhada Promo

अक्षराला लागलं आहे प्रेमाचं वेड, पत्नीने प्रेमाची कबूल देण्याची अधिपतीची इच्छा, रोमँटिक ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.