मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षराला लागलं आहे प्रेमाचं वेड, पत्नीने प्रेमाची कबूल देण्याची अधिपतीची इच्छा, रोमँटिक ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 18, 2024 | 4:05 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Tula Shikvin Changalach Dhada Promo

अक्षराला लागलं आहे प्रेमाचं वेड, पत्नीने प्रेमाची कबूल देण्याची अधिपतीची इच्छा, रोमँटिक ट्विस्ट

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळाली आहे. या मालिकेत अक्षरा व अधिपती यांची प्रेमकहाणी पाहणं रंजक ठरत आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. भुवनेश्वरीची चाल, नवनवीन डाव आणि त्यावर अक्षराने फेरलेलं पाणी हे सर्व प्रेक्षक एन्जॉय करत आहेत. शिवाय या मालिकेच्या कथेतून शिक्षणाचे धडेही रसिक प्रेक्षकांना मिळत आहे. शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी ही मालिका आहे. (Tula Shikvin Changalach Dhada Promo)

मालिकेत अक्षरा व अधिपती यांची प्रेमकहाणी पाहणं रंजक ठरत आहे. मात्र भुवनेश्वरी अक्षरा व अधिपती यांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी काही ना काही चाल आखत असतात. अधिपतीला गाणं शिकायचं असतं ही संधी साधत भुवनेश्वरी सरगम मॅडमना अधिपतीच्या आयुष्यात घेऊन येते. आणि अक्षरा व अधिपती यांच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी तिला पैसेही देते. भुवनेश्वरी व सरगमचा हा डाव, सरगमची अधिपतीजवळची जवळीक अक्षरा ओळखते आणि तिच्यावर लक्ष ठेवून असते.

आणखी वाचा – धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्याची गळफास घेत आत्महत्या, सुसाइड नोटही सापडली, जवळच्या मैत्रिणीचाही कार अपघातात मृत्यू

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तर एकीकडे अक्षरा व अधिपती दोघांनाही एकमेकांवरील प्रेमाची कबुली द्यायची आहे. त्यासाठी दोघेही धडपडत असतात. समोर आलेल्या प्रोमोमध्ये अधिपती त्याच्या पाकिटातील अक्षराच्या फोटोकडे पाहत तिच्या संवाद साधतो. तो म्हणतो की, “आपल्या लग्नाच्या आधी मला असं वाटायचं की, सरळ तुमच्या घरी जावं. तुम्हाला समोर बसवावं आणि तुमच्यापुढे गुडघ्यावर फुल वगैरे घेऊन बसावं. मग हवा जाईल. जशी आता तुमची परिस्थिती झाली आहे. सेम टू सेम आता तुमचंही माझ्यासारखं झालं आहे”.

आणखी वाचा – घरी परतल्यानंतर ‘तारक मेहता…’ फेम सोढीचा पहिला फोटो समोर, अशी झाली आहे अवस्था, ओळखणंही कठीण, वडील म्हणाले, “त्याचे अपहरण…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

“खरं सांगतो. आताच इतकं धडधड होत आहे. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होत तेव्हाही अगदी असंच झालं होतं”, असं म्हणत अधिपती नाचू लागतो. तर इकडे अक्षराही अधिपतील फोन करुन वेळ असेल तर फिरायला रंकाळा येथे जायचं का?, असं विचारते. आता रंकाळाला गेल्यावर अक्षरा व अधिपती एकमेकांवरील प्रेमाची कबुली देणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi serialTula shikvin Changalach DhadaTula Shikvin Changalach Dhada Promozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
suchitra on shahrukh khan and karan johar

शाहरुख खान, करण जोहरमध्ये शारिरीक संबंध, दोघं एकत्रित लंडनला जायचे कारण…; गायिकेचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, "समलैंगिक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.