मनोरंजन सृष्टीतून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या जवळच्या मित्राचे निधन झाले असल्याचे एक दु:खद वृत्त समोर येत आहे. आमिर खानचा मित्र महावीर चड यांचे एका रस्ते अपघातात निधन झाले आहे. त्यामुळे आपल्या मित्राच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आमिर खान हा नुकताच गुजरातमधील कच्छ या गावी पोहोचला आहे.
आमिर खानचा मित्र महावीर चड याने आमिरसह ‘लगान’ चित्रपटात काम केले होते. महावीर चड यांनी २००१ साली आलेल्या ‘लगान’ चित्रपटात लाइन प्रोड्यूसर म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडली होती. ‘लगान’ चित्रपटाचे शूटिंग कच्छमध्ये झाले होते. अशातच मित्राच्या अपघाती निधनाची बातमी समजताच आज (रविवार २१ जानेवारी) रोजी आमिर त्याच्या खाजगी विमानाने भुजमध्ये मित्राच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचला आहे.
#Gujarat #Bollywood
— Kaushik Kanthecha ???????? (@Kaushikdd) January 21, 2024
सच्ची दोस्ती ????????
Aamir Khan reached Kotay, Kutch to meet the family of his dear friend and line producer on the sets of Lagaan, Mahavir Chad, who recently passed away in a tragic incident. This beautiful gesture of Aamir Khan is a shining example of true… pic.twitter.com/rYr6TEuy5o
नुकताच आमिर खान त्याची लाडकी मुलगी आयरा खानच्या लग्नात व्यस्त होता. मुंबईत नोंदणीकृत विवाह आणि उदयपूरमध्ये ख्रिश्चन विवाहानंतर एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक नामवंत कलाकार, राजकारणी यांसह उदयोजकही सहभागी झाले होते. लेकीच्या लग्नात आमिर वडील म्हणून जबाबदारी पार पडताना दिसून आला.
आणखी वाचा – “इतिहास नीट सांगितला… ”, ‘प्रोपगंडा’ चित्रपटांबद्दल मनोज जोशींचं परखड मत, म्हणाले “त्यात काही गैर…”
अशातच मित्राच्या निधनाचे कळताच आमिर मित्रासाठी नुकताच गुजरातला गेला आहे. तसेच यानंतर आमिर ‘लगान’ चित्रपटाचे शूटिंग झालेल्या ठिकाणालाही भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आमिर आपल्या मित्राच्या निधनाच्या बातमीने दु:ख अनावर झाले आहे.