छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व बहूचर्चित शो म्हणजे ‘बिग बॉस’. बिग बॉसचे यंदाचे १७वे पर्व होते. यंदाचे पर्व हे अनेक कारणांनी गाजले याचे मुख्य कारण म्हणजे या शोमध्ये रोजचे वादविवाद व भांडणे. स्पर्धकांमधील रोजचे वादविवाद, मतभेद व भांडणांमुळे यंदाचे ‘बिग बॉस’चे पर्व चांगलेच गाजले. आता हा शो अंतिम टप्प्यात आला असून महाअंतिम सोहळ्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये या घरातील आयेशा खानचा प्रवास संपला आहे. घरातील सदस्यांसाठी रोस्ट नाईटचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात सर्व स्पर्धकांनी घरात आलेल्या प्रेक्षकांसमोर सादरीकरण केले. सर्व स्पर्धकांच्या कामगिरीवर तेथे उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना मत दिले. या मतदानाच्या आधारे आयेशाला सर्वात कमी मते मिळाले आणि त्यामुळेच आयेशा या घरातून बाहेर पडली.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच आयेशाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “बिग बॉसचा हा प्रवास माझ्यासाठी कठीण होता. तसेच या शोदरम्यान, भावनांची पराकाष्टा झाली. परंतु तुम्ही (चाहत्यांनी) दिलेले प्रेम व पाठिंबा पाहून मी भारावून गेले आहे. तुमच्याशिवाय हे अजिबात शक्य नव्हते. तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमची कृतज्ञ व ऋणी आहे.”
आणखी वाचा – लेकीच्या लग्नानंतर आमिर खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या मित्राचे अपघाती निधन, अभिनेत्याला शोक अनावर
तसेच यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी माझं आयुष्य तुमच्या हातात सोपवलं आहे. त्यामुळे मला फक्त आता तुमच्या प्रेमाची गरज आहे.” असंही म्हटलं आहे. दरम्यान, यापुढे आयेशाने लिहिलेल्या वाक्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आयेशाच्या “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त (पिक्चर अजून बाकी आहे)” या वाक्यावर साऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
आणखी वाचा – “इतिहास नीट सांगितला… ”, ‘प्रोपगंडा’ चित्रपटांबद्दल मनोज जोशींचं परखड मत, म्हणाले “त्यात काही गैर…”
दरम्यान, आयेशाने हे वाक्य खास मुन्नवरसाठी लिहिले असल्याचा अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवला जात आहे. आयेशाने घरात येताच ती मुन्नवरचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटली होती. यानंतर घरात अनेकदा आयेशाने मुन्नवरबरोबर वाद घातले असल्याचेही पाहायला मिळाले. पण नुकताच तिचा या घरातील प्रवास संपला आहे. हा प्रवास संपला असला तरी भविष्यात आयेशा मुन्नवरबाबत खुलासे करणार असल्याचे या पोस्टवरुण् वाटत आहे.