प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शारदा सिन्हा यांचे ५ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झाले. बिहार येथे राहणाऱ्या शारदा या त्यांच्या आवाजासाठी खूप प्रसिद्ध होत्या. बिहारची कोकिळा म्हणून त्यांची अधिक ओळख. मृत्यूसमयी या ७२ वर्षांच्या होत्या. शारदा यांना २०१८ साली मायलोम आजार असल्याचे निदान झाले होते. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निधनाने सगळ्याच चाहत्यांना मोठे दु:ख झाले आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण पसरले आहे. आशातच आता त्यांचा रुग्णालयातील एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे चाहते आता अधिकच भावुक झाले आहेत. (sharda sinha viral video)
दिवंगत गायिका शारदा यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना २७ ऑक्टोबर २०२४ रोजी रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी त्यांची अवस्था गंभीर होती. उपचारादरम्यानेच ५ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत एम्स रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आणि नंतर त्यांचा मुलगा अंशुमन सिन्हाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.
अपने आखिरी पलों में छठ गीत गाती शारदा सिन्हा जी, वीडियो देखकर आंखों में आंसू आ गया 🙏🥹 pic.twitter.com/lZCdAH7voX
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) November 8, 2024
दरम्यान आता त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामदये शारदा रुग्णालयातील एका बेडवर झोपलेल्या दिसून येत आहेत. तसेच त्या छटचे गीतदेखील गाताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची नातदेखील गाणं गाताना दिसत आहे. यावरुन त्यांचे संगीतावर असणारे प्रेम दिसून येत आहे. हे पाहून सगळ्यांनाच अश्रु अनावर झाले आहेत.
शारदा यांचे पती डॉ. ब्रुजभूषण सिन्हा यांचेही काही महिन्यांपूर्वी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर शारदा यांची तब्येत खालावली होती. २०१८ आधीच त्यांना मायलोमा असल्याचे समोर आले होते. दरम्यान रुग्णालयात भरती होण्याच्या काही दिवस आधीच त्यांना खाण्यापिण्यामध्ये समस्या येऊ लागल्या होत्या. मात्र त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.