मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियाबरोबर तितीक्षाचे स्वत:चे एक युट्यूब चॅनेलदेखील आहे. तितीक्षा तावडे ही युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील काही खास क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सेटवरील मजामस्ती, आयुष्यातील काही हळवे क्षण, तसंच नवरा सिद्धार्थ बोडकेबरोबरचे काही मजेशीर क्षण तितीक्षा तिच्या या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असते आणि तिच्या या या व्लॉग व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो. (Titeeksha Tawde on Aishwarya Narkar Vanity Bag)
अशातच आता तितीक्षाने तिच्या युट्यूब व्लॉगवरुन ऐश्वर्या नारकरांच्या व्हॅनिटीची खास झलक दाखवली आहे. तितीक्षा तावडे व ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. मालिकेत या दोघी नायिका व खलनायिका आहेत. पण ऑफस्क्रीन यांची चांगलीच मैत्री आहे आणि त्यांच्या याच मैत्रीचे खास क्षण या युट्यूब व्लॉग व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधून तितीक्षा तावडेने ऐश्वर्या नारकरांच्या व्हॅनिटीमध्ये नेमकं काय आहे ही दाखवण्यात आलं आहे.
आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’चा रिमेक येणार?, मालिका शेवटाकडे असताना दिग्दर्शकांचं भाष्य, म्हणाले, “रिमेक करायला…”
तितीक्षा तावडे व एकता डांगर या ऐश्वर्या यांची नक्कल करत या व्हिडीओच्या सुरुवात करतात. पुढे तितीक्षा ऐश्वर्या यांच्या व्हॅनिटीमध्ये नेमकं काय काय आहे असं म्हणते आणि त्यांची व्हॅनिटी बघायला घेते. पुढे तितीक्षा ऐश्वर्या यांच्याकडचे एकेक मेकअप सामान दाखवतात. यावेळी दोघी चाहत्यांशी संवाद साधतात आणि त्यांचे हे संवाद आइकून प्रेक्षकांचेही मनोरंजन होईल. यादरम्यान, व्हिडीओच्या मध्ये इंद्राणी म्हणजेच अभिनेत्री श्वेता मेहंदळेही येते. तरी ऐश्वर्या नारकरांकडे मेकअपचे अनेक सामान असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
या संपूर्ण व्हिडीओमध्ये ऐश्वर्या यांनी एक नवीन व्हॅनिटी बॅग घेतली असून त्यांच्या जुन्या बॅगमधील मेकअपचे सामान नवीन बॅग मध्ये ठेवतानाचे पाहायला मिळत आहे. तसंच ऐश्वर्या यांनी त्यांच्या जुन्या व्हॅनिटीचा कसा उपयोग होऊ शकतो. याबद्दलही सांगितले आहे. दरम्यान, सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत ऐश्वर्या यांची भूमिका नकारात्मक होती. मात्र आता या मालिकेतील कथानकामध्ये तिची भूमिका सकारात्मक असल्याचे पाहायला मिळत आहे.