सध्या सर्वत्र ‘बिग बॉस १८’ची चर्चा सुरु आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून कार्यक्रमामध्ये अनेक ट्विस्टदेखील पाहायला मिळाले. या शोबाबत वेळोवेळी नवीन अपडेट्स समोर येत आहेत. शोमधील टास्कवरून स्पर्धकांमध्ये प्रचंड भांडण सुरु आहे. एवढेच नाही तर आता हे भांडण शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. अशा स्थितीत दर आठवड्याला प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न असतो तो म्हणजे या या घरात कोण आपले स्थान टिकवून ठेवणार आणि कोणाला या घरचा निरोप घ्यावा लागणार? ‘बिग बॉस १८’बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. (bigg boss double eviction)
या आठवड्यात एकूण पाच खेळाडूंच्या डोक्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार होती. यामध्ये विवियन डिसेना, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांच्या नावांचा समावेश होता. त्यामुळे या प्रक्रियेतून मुस्कानलं घर सोडावे लागले आहे. अशातच आता एक नवीन माहिती समोर आली असून नायरा बॅनर्जीदेखील या कार्यक्रमातून बाहेर पडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात एकामागोमाग एक स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. यामध्ये मुस्कान पाठोपाठ नायराचं नावदेखील समोर आले आहे. नायरा या शोमध्ये तब्बल ४०० कपडे घेऊन पोहोचले होते. ती शेवटपर्यंत या घरात राहील असा विश्वास तिला होता पण तिचे हे स्वप्न अपूर्ण राहिलं.
मुस्कान बाहेर पडल्यानंतर नायरावर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. त्यामुळे ‘विकेंड का वार’मध्ये नक्की कोण बाहेर जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्याआधीच नायराला घराबाहेर पडावे लागले. त्यामुळे नायराच्या चाहत्यांना मोठं धक्का बसला आहे. आता पुढे या कार्यक्रमात काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘बिग बॉस’ ६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. २० दिवसांमध्ये ३ स्पर्धकांना बाहेर पडावे लागले आहे. या घरात आता विवियन डीसेना, चाहत पांडे, एलिस कौशिक, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा, तजिंदर सिंह बग्गा, करणवीर मेहरा, शाहजादा धामी, रजत दलाल, चुम दरांग व ईशा सिंह हे स्पर्धक बाकी आहेत.