रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांना कुठलीच पदवी दिली नाही आणि…”, लक्ष्मीकांत यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रिया बेर्डेंची पोस्ट, म्हणाल्या, “अजूनही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2024 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priya Berde Shared Emotional Post

जन्मदिवसानिमित्त लक्ष्मीकांत यांच्या आठवणीत प्रिया बेर्डेंची खास पोस्ट

Priya Berde Shared Emotional Post : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय व हरहुन्नरी अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे होय. या अवलियाने आपल्या अनोख्या शैलीच्या जोरावर लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या अभिनेत्याला वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण ‘लक्ष्या’ या नावानेच ओळखतात. कारण हा अभिनेता सर्वसामान्य लोकांना आपलासा वाटतो. अनेकजण त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. त्यामुळेच लोक लक्ष्मीकांत यांचा एकेरी उल्लेख करतात. लक्ष्मीकांत यांनी कमी वयात जगाचा निरोप घेतला. पण चाहत्यांच्या मनात ते आजही घर करुन आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ‘झपाटलेला’, ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘अफलातून’ असे कित्येक चित्रपट आजही तितक्याच आवडीनं पाहिले जातात आणि त्यामुळे लक्ष्मीकांत यांची लोकप्रियता आजही कायम आहे. आज लक्ष्मीकांत यांचा जन्मदिवस आहे. लक्ष्मीकांत यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी सोशल मीडियावरुन भावुक पोस्ट केली आहे. लक्ष्मीकांत यांचा फोटो शेअर करत खूप सुंदर असं कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – माधुरी दीक्षितसह स्टेजवर परफॉर्म करताना विद्या बालन खाली पडली अन्…; पुढे काय झाले ते पाहून व्हाल थक्क

View this post on Instagram

A post shared by Prreeya Berde (@prreeyaberde)

प्रिया बेर्डे यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की, “७० वर्ष. आज जन्मदिवस. अजूनही तुमचं गारुड लोकांच्या मनावर आहे, एक अभिनेता, चांगला माणूस म्हणून आज ही लोक तुमच्या बद्दल तेवढ्याच उत्साहाने बोलतात. विनोद अनेक रुपाने समोर आला कधी दादागिरीने तर कधी विनोदाचा सम्राट, तर कधी भोळा भाबडा राजा म्हणून पण या महारथींच्या मांदियाळीत या कार्ट्याने स्वतःची शैली, स्वतःच वेगळेपण सिद्ध केलं. त्यांना कुठलीच पदवी दिली गेली नाही तो कायम सगळ्यांसाठी लक्ष्याच राहिला आणि राहणारही फक्त ‘लक्ष्या'”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : “तर आईच्या पुढ्यात डोकं ठेवा…”, संकर्षण कऱ्हाडेने आईबाबत सादर केली कविता, उपस्थितही रडू लागले अन्…

लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे यांची दोन्ही मुलंही सिनेविश्वात कार्यरत आहेत. अभिनय बेर्डे व स्वानंदी बेर्डे अशी त्यांची नाव आहेत. तर प्रिया बेर्डे गेली अनेक वर्ष चित्रपट, मालिका, नाटकांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही प्रिया बेर्डे झळकल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. अभिनयाबरोबर प्रिया बेर्डे राजकारणात सक्रिय असून त्या कलाकार व तंत्रज्ञ यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या अनेक प्रयत्न करतात.

Tags: lakshmikant berdepriya berdePriya Berde Shared Emotional Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Ranbir Kapoor And Alia Bhatt

रणबीर कपूर पापाराझींवर ओरडताच आलिया घाबरली, पार्टीतून बाहेर आल्यावर घडला 'हा' प्रकार, नेमकं काय झालं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.