शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निक्की ताई व अरबाज दाजींना भेटायला आला छोटा पुढारी, भेट झाल्यानंतर म्हणाला, “कोण आपलं, परकं आणि…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 26, 2024 | 2:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
chota pudhari viral video

छोटा पुढारीने घेतली निक्की व अरबाजची भेट , कॅप्शनने वेधलं लक्ष

‘बिग बॉस’ मराठीचं पाचवं पर्व अधिक चर्चेत राहिलं. यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील, सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्स अशा अनेक क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली होती. या पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळी, छोटा पुढारी म्हणजे घन:श्याम दरवडे व अरबाज पटेल हे त्रिकुट चांगलेच चर्चेत राहिले. या पर्वामध्ये निक्की व छोटा पुढारी यांचे भावा-बहिणीचे नातं असल्याचे दोघांनीही सांगितले होते. तसेच निक्की व अरबाज यांच्यामध्ये प्रेमाचे वारे वाहतानादेखील दिसले. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला. मात्र शो संपल्यानंतरही अनेक स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात असलेलं बघायला मिळाले. निक्की व अरबाजचे अनेक फोटो व व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. (chota pudhari viral video)

अशातच आता निक्की, अरबाज व छोटा पुढारी यांची भेट झालेली दिसून येत आहे. या तिघांचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. घनश्यामने हा व्हिडिओ शेयर केला आहे यामध्ये निक्की, अरबाज व छोटा पुढारी दिसून येत आहेत. यावेळी निक्की म्हणते की, “घनश्याम खास आम्हाला भेटण्यासाठी मुंबईला आले आहेत”, त्यावेळी घनश्याम म्हणतो की, “ताई तुझा भाऊ आला की नाही तुला भेटायला?”, त्यावर निक्की म्हणते, “हो. आम्हीदेखील २५ डिसेंबरला तुझ्या वाढदिवसाला, तुला व तुझ्या घरच्यांना भेटायला येणार”.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Chota Pudhari official(Ganesh Daravade) (@chotapudhari_official)

पुढे घनश्याम म्हणतो की, “निक्की ताई म्हंटल्या की विषय संपला. निक्की ताई व अरबाज दाजी येतील”, त्यावेळी निक्की मोठ्याने “दाजी? बाई..असं म्हणते”. हा व्हिडिओ शेअर करत घनश्यामने लिहिलेलं कॅप्शनदेखील लक्ष वेधून घेत आहे. या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आज समजलं दिलेला शब्द खरा कोण करतं ते?, कोण बोलतं? आणि कोण माझ्यासाठी आलं ते? कोण आपलं? कोण परकं? तुम्हीच ठरवा आता”.

आणखी वाचा – श्वानाच्या दीड महिन्याच्या पिल्लावर तरुणाकडून लैंगिक अत्याचार, अभिनेत्रीने केले उपचार, पोस्ट करत म्हणाली, “अशी वेळ कोणावरही…”

दरम्यान घनश्यामची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टवर त्याने नक्की कोणावर निशाणा साधला आहे? याबद्दल चाहते अंदाज बांधत आहेत. सध्या निक्कीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती पंजाबी मनोरंजन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आहे. लवकरच ती पंजाबी चित्रपटातील आयटम सॉंगमध्ये झळकणार आहे.  

Tags: Arbaz Patelchota pudharinikki tamboliviral video
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
twinkle khanna on childrens

ट्विंकल खन्नाच्या मुलांच्या त्वचेच्या रंगावरुन सगळे करत आहेत तुलना, अभिनेत्री भडकली, म्हणाली, "पहिलं मूल हे..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.