‘बिग बॉस’ मराठीचं पाचवं पर्व अधिक चर्चेत राहिलं. यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील, सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्स अशा अनेक क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली होती. या पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळी, छोटा पुढारी म्हणजे घन:श्याम दरवडे व अरबाज पटेल हे त्रिकुट चांगलेच चर्चेत राहिले. या पर्वामध्ये निक्की व छोटा पुढारी यांचे भावा-बहिणीचे नातं असल्याचे दोघांनीही सांगितले होते. तसेच निक्की व अरबाज यांच्यामध्ये प्रेमाचे वारे वाहतानादेखील दिसले. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला. मात्र शो संपल्यानंतरही अनेक स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात असलेलं बघायला मिळाले. निक्की व अरबाजचे अनेक फोटो व व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. (chota pudhari viral video)
अशातच आता निक्की, अरबाज व छोटा पुढारी यांची भेट झालेली दिसून येत आहे. या तिघांचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. घनश्यामने हा व्हिडिओ शेयर केला आहे यामध्ये निक्की, अरबाज व छोटा पुढारी दिसून येत आहेत. यावेळी निक्की म्हणते की, “घनश्याम खास आम्हाला भेटण्यासाठी मुंबईला आले आहेत”, त्यावेळी घनश्याम म्हणतो की, “ताई तुझा भाऊ आला की नाही तुला भेटायला?”, त्यावर निक्की म्हणते, “हो. आम्हीदेखील २५ डिसेंबरला तुझ्या वाढदिवसाला, तुला व तुझ्या घरच्यांना भेटायला येणार”.
पुढे घनश्याम म्हणतो की, “निक्की ताई म्हंटल्या की विषय संपला. निक्की ताई व अरबाज दाजी येतील”, त्यावेळी निक्की मोठ्याने “दाजी? बाई..असं म्हणते”. हा व्हिडिओ शेअर करत घनश्यामने लिहिलेलं कॅप्शनदेखील लक्ष वेधून घेत आहे. या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आज समजलं दिलेला शब्द खरा कोण करतं ते?, कोण बोलतं? आणि कोण माझ्यासाठी आलं ते? कोण आपलं? कोण परकं? तुम्हीच ठरवा आता”.
दरम्यान घनश्यामची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टवर त्याने नक्की कोणावर निशाणा साधला आहे? याबद्दल चाहते अंदाज बांधत आहेत. सध्या निक्कीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती पंजाबी मनोरंजन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आहे. लवकरच ती पंजाबी चित्रपटातील आयटम सॉंगमध्ये झळकणार आहे.