टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध मराठी मालिका ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतील आरोही म्हणजेच कौमुदी वलोकर लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कौमुदीच्या लग्नाआधीच्या विधीना सुरुवात झाली होती. ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत या सगळ्या समारंभाची झलक सोशल मीडियावर बघायला मिळाली होती. अशातच आता ही अभिनेत्री थोरा-मोठ्यांच्या साक्षीने लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे काही खास फोटो समोर आले आहेत. लग्नविधीच्या वेशात कौमुदी व आकाश दोघंही खूप सुंदर दिसत आहे. गेल्या वर्षी आकाश व कौमुदीचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर एका वर्षातच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (kaumudi walokar wedding)
कौमुदी व आकाश यांचा पारंपरिक विवाह सोहळा पार पडला आहे. यावेळी कौमुदीने चिंतामणी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तसेच त्यावर मॅचिंग गुलाबी रंगाचा ब्लाऊज व गुलाबी रंगाची शाल घेतली आहे. तसेच सुंदर असे उठावदार दागिनेदेखील परिधान केले आहेत. तसेच आकाशने फिकट पांढऱ्या रंगाचा कुर्ता, गुलाबी रंगाचे धोतर परिधान केले आहे. तसेच त्यावर मॅचिंग आणि कौमुदीच्या साडीला मॅचिंग शाल घेतली आहे. दोघा नवरा-नवरीचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला आहे.
समोर आलेल्या फोटोपैकी एका फोटोमध्ये दोघंही आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये आकाश कौमुदीच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये दोघंही सप्तपदी घेताना दिसत आहेत. तसेच यामध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज दिसत असून अजून एका फोटोमध्ये कान पिळण्याची प्रथा दिसून येत आहे. हे फोटो शेयर करत कौमुदीने “साथ सात जन्माची”असे कॅप्शन दिले आहे. कौमुदीच्या या फोटोंवर अनेक कलाकार व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
तिच्या हळदी समारंभाचे व मेहंदी समारंभाचे काही फोटो समोर आले होते. कौमुदीच्या साधेपणाच्या हळदीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. अशातच तिच्या संगीत सोहळ्याचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले होते. यामध्ये कौमुदी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. दरम्यान आता आकाश व कौमुदी लग्नबंधनात अडकले आहेत.