बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमी चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही त्याची चर्चा होत असते. बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाबरोबर २००१ साली तो लग्नबंधनात अडकला. राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची मुलगी असूनही ट्विंकलला चित्रपटसृष्टीमध्ये म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. नंतर तिने एक लेखिका म्हणून नावारुपास आली. सध्याच्या आघाडीच्या लेखकांमध्ये ट्विंकलचं नाव आवर्जून घेतलं जातं. लेखनाने प्रसिद्ध असलेली ट्विंकल सोशल मीडियावर कोणत्याही विषयावरील मत ती परखडपणे मांडताना दिसते. अशातच आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. (twinkle khanna on childrens)
ट्विंकल व अक्षय यांना आरव व नितारा अशी दोन मुलं आहेत. आरव परदेशात शिकत आहे तर नितारा सोशल मीडियापासून पूर्ण लांब असलेली दिसून येते. मात्र आरव व निताराच्या त्वचेच्या रंगाची नेहमी तुलना केली जाते. यावर आता ट्विंकल व्यक्त झाली आहे. ट्विंकलने नुकताच FICCI FLO बरोबर संवाद साधला. यावेळी तिने दोन्ही मुलांच्या त्वचेच्या रंगावर कशी तुलना केली जाते याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, “मी माझ्या पहिल्या मुलाबरोबर खूप काही शिकले. पहिले मूल हे एक मन्युअल असते. आपण त्यावर अनेक प्रयोग करत असतो. दुसऱ्या बाळाच्या वेळी वाटलं की ही एक सामान्य भारतीय मुलगी दिसत आहे. नेहमीच तिच्यामध्ये आणि तिच्या भावामध्ये तुलना होणार. आपल्या देशात अशा गोष्टी घडतात”.
पुढे ती म्हणाली की, “ती स्वतःला खूप खास समजेल अशी मी नेहमी मुलीला जाणीव करुन देते. ती खूप सुंदर आहे. फ्रीडा कालो जशी सुंदर आहे तशीच तूदेखील सुंदर आहेस असं मी तिला नेहमी सांगते. जर तर सावळी आहे तर मी तिला सांगेन की तिचा रंग सोनेरी आहे”. दरम्यान ट्विंकलला तिच्या दोन्ही मुलांचा खूप गर्व असल्याचे ती नेहमी सांगत असते.
ट्विंकल तिच्या मुलांबरोबर शक्य तितका वेळ घालवत असते. सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरीही अक्षयला ती अधिक पाठिंबा देताना दिसते. दोघांचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.