शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कृपया ‘पुष्पा २’साठी पैसे घालवू नका आणि…”, अंकिता वालावलकरला आवडला नाही अल्लू अर्जुनचा चित्रपट, म्हणाली, “स्टोरी नाहीच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 7, 2024 | 3:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ankita Walavalkar On Pushpa 2

अंकिता वालावलकरला आवडला नाही अल्लू अर्जुनचा चित्रपट

Ankita Walavalkar On Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ द रूल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात जबरदस्त कमाई करत आहे. दुसऱ्या दिवसाचा वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस रिपोर्टही आला आहे.अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २: द रुल’ने रिलीज होताच अनेक सुपरस्टार्सच्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सुकुमार दिग्दर्शित तेलुगू ॲक्शन ड्रामा हा २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वेल आहे. पुष्पा राजची जादू केवळ भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे.

अनेक कलाकार मंडळी व चाहते मंडळी हा चित्रपट पाहत आहेत. अशातच हा चित्रपट सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ फेम अंकिता वालावलकर हिने पाहिला. अंकिता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अंकिताने पुष्पा २ हा चित्रपट पाहिल्यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चित्रपटाबाबत तिला काय वाटतं हे तिने इंस्टाग्रामद्वारे स्पष्टपणे मांडलं आहे. सर्वत्र ‘पुष्पा २’ ची क्रेझ पाहायला मिळत असताना अंकिताने या चित्रपटाबाबत मांडलेलं तिचं मतं विचार करायला भाग पाडतंय.

आणखी वाचा – डिलिव्हरी रुमबाहेर पत्नीच्या किंकाळ्या ऐकून सुप्रसिद्ध अभिनेत्याची झालेली वाईट अवस्था, म्हणाला, “कधीच बाप होणार नाही आणि…”

अंकिताने चित्रपट पाहून आल्यावर स्टोरी पोस्ट करत असं म्हटलं की, “अभिनय १००/१०० . स्टोरी काहीच नाही. पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग यापेक्षा खूप चांगला होता. कृपया तुम्ही तुमचे पैसे वाया घालवू नका. मला वाटतं करमणूक हे एक सशक्त माध्यम आहे आणि जे चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात ते काळजीपूर्वक चालले पाहिजेत”. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाबाबत अंकिताने केलेलं विधान अधिक लक्षवेधी आहे.

आणखी वाचा – “BMC, कचरा टाकणारी जनता निर्लज्ज…”, फिल्मसिटीमधील कचऱ्याचा ढिग पाहून वैतागला शशांक केतकर, म्हणाला, “अशी हजारो ठिकाणं…”

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ने बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कामगिरी केली आहे. सर्व भाषांमध्ये १७४.९ कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ही पकड तशीच ठेवली. भारतात या चित्रपटाने तब्बल ९०.०१ कोटींची कमाई केली. Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, दोन दिवसात २६५ कोटींच्या मोठ्या कलेक्शनसह, ‘पुष्पा २’ ने अधिकृतपणे जगभरात ४०० कोटी कलेक्शनचा टप्पा ओलांडला आहे.

Tags: ankita walavalkarAnkita Walavalkar On Pushpa 2pushpa 2
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
pushpa 3 announcement

बहुचर्चित 'पुष्पा'च्या तिसऱ्या भागात नक्की काय घडणार?, दुसऱ्या भागाचा शेवट पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, अशी असणार कथा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.