Ali asgar On Wife Painful Delivery : टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अली असगर. अली असगरच्या अभिनयाचे लाखो दिवाने चाहते आहेत. त्याच्या अभिनयाने आणि विनोदी बुद्धीने त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. इतकंच नाही तर अभिनेता त्याच्या कुटुंबाबाबतही नेहमीच काही ना काही शेअर करताना दिसतो. अभिनेत्याला दोन मुलं आहेत. सोशल मीडियावरही अली बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अनेक फनी रील व्हिडीओ तो पोस्ट करत प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. अलीच्या या रील व्हिडीओला नेटकऱ्यांकडून नेहमीच पसंती मिळालेली पाहायला मिळाली आहे. अभिनय जगतात व सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या अलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे.
अभिनेत्याने नुकतीच रुबिना दिलैकच्या पॉडकास्टमध्ये हाजरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या पत्नीच्या गर्भधारणेबद्दल सांगितले. पहिल्या मुलाच्या प्रसूतीच्या वेळी पत्नीला वेदना होत असल्याचे पाहून त्याला फार दुःख झाले. अली असगरने असेही सांगितले की, ती इतकी घाबरली होती की तिने दुसरे मूल न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्याने त्याच्या पहिल्या मुलाच्या नुयानच्या जन्माची संपूर्ण कथा रुबिना दिलैकबरोबर शेअर केली आहे. त्याने सांगितले की, जेव्हा तो प्रसूतीसाठी घरुन निघाला तेव्हा त्याची पत्नी खूप उत्साहित होती आणि तो तिला हॉस्पिटलमध्ये सोडून शूटिंगसाठी गेला होता.
आणखी वाचा – तारीख ठरली! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात
अली असगरने सांगितले की, त्यानंतर त्याच्या पत्नीला पेनचे इंजेक्शन देण्यात आले आणि जेव्हा तो शूटवरुन परतला तेव्हा त्याच्या पत्नीची प्रकृती इतकी बिघडली होती की, तिच्याकडे बघवतही नव्हते. त्याच्या पत्नीच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे होती आणि ती वेदनेने ओरडत होती. याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, “माझ्या पत्नीला वेदना होत असल्याचे पाहून मी इतका अस्वस्थ झालो की, नंतर मी कधीच बाप होणार नाही, असे सांगू लागलो. मला तिला पुन्हा एकदा असे दुःख द्यायचे नव्हते आणि तिला अशा परिस्थितीत टाकायचे नव्हते. सलग दोन तास दुखत राहिल्यानंतर प्रसूती झाली”.
अली असगर म्हणाला, “तिच्या या त्रासामुळे त्याच्या पत्नीला सी-सेक्शन करावे लागले आणि ऑपरेशनमुळे मुलगा झाला”. डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला बाहेर काढले तेव्हा त्यांना भीती वाटत होती की आपल्या मुलावर परिणाम होऊ शकतो. यामुळे तो आपल्या मुलांना घेऊन पाळणाघरात गेला. याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, “माझ्या मनात हा ध्यास कुठून आला हे मला माहीत नाही. त्यानंतर मी अर्धा तास माझ्या मुलांवर लक्ष केंद्रित केले आणि यादरम्यान मी माझ्या पत्नीला पूर्णपणे विसरलो होतो”. मात्र, आता अली असगर दोन मुलांचा वडील असून तो आपल्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे.