शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Video : ‘बिग बॉस’ थीम, दोघांचेही फोटो अन्…; अमृता देशमुखच्या हातावरील मेहंदी आहे फारच खास, व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 17, 2023 | 5:56 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Marathi News

अमृता देशमुख प्रसाद जवादे लग्न

Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ही जोडी आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’ या रिऑलिटी कार्यक्रमातून प्रसाद व अमृता यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रेमाची कबुली दिली आणि लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता ती घटीका जवळ आली आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगले व्हायरल होताना दिसतात. गुरुवारी त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. त्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.(Amruta Prasad attractive mehendi design video)

मेहंदीच्या कार्यक्रमासाठी दोघंही खूप छान तयार झालेले दिसले. वर व वधु पारंपारिक अंदाजात पाहायला मिळाले. अमृताने यावेळी पिवळ्या रंगाचा डिझाइनर लेहंगा घातला होता. त्या लेहंग्यावर तिने फुलांनी सजलेले व मोत्यांनी बनलेले दागिने परिधान केले होते. तर प्रसादने हिरव्या व मोती कलरचा सदरा, पायजमा परिधान केला होता. अगदी साध्या पण सुंदर पद्धतीत त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला.

View this post on Instagram

A post shared by Kkanchan Mehendi ???? (@kkanchan_mehendi_)

आणखी वाचा – “त्याला जिंकवण्यासाठी…”, ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनच्या रनरअपचा १९ वर्षांनंतर मोठा खुलासा, अभिजीतचा उल्लेख करत म्हणाला, “केवळ प्रसिद्धी…”

अमृताच्या हातावरील मेहंदी विशेष लक्षवेधी ठरली. अमृताच्या हातावर दोघांचीही ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नेमप्लेट घेवून उभे असतानाची प्रतिकृती दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या मेहंदीवर विविध फुलांची, मोराची डिझाईन पाहायला मिळाली. कमळ आणि मोराचा पिसारा हे या मेहंदीच्या डिझाइनमध्ये विशेष पाहायला मिळालं. महाल, हत्ती यांसारखे विविध डिझाईन्सने अमृताची मेहंदी भरून गेली होती. सुंदर व छान डिझाईनने नवरीच्या हातावरची मेहंदी सजली होती. तर नवऱ्या मुलानेही म्हणजेच प्रसादनेही अमृताच्या नावाची मेहंदी हातावार लावलेली दिसली. ‘अमृतमय जाहलो’, असं प्रसादने स्वतःच्या हातावर लिहून घेतलेलं पाहायला मिळालं. या कार्यक्रमाच्या व्हिडीओत दोघंही बरेच आनंदी दिसले.

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

आणखी वाचा – तमन्ना भाटिया व विजय वर्मा लवकरच अडकणार विवाहबंधनात?, आई-वडिलांच्या दबावामुळे घेतला निर्णय कारण 

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने कमेटं केली, ‘साधं पण सुंदर देव तुम्हा दोघांवर कृपा करो’, असं लिहीलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘खूप छान’ अशी कमेंट केली आहे. तर बऱ्याच नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी शेअर करत त्यांच कौतुक केलं आहे.    

Tags: amruta deshmukhprasad jawade
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Rekha Boj On World Cup 2023

"भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी बीचवर न्यूड धावणार", Ind Vs Aus मॅचबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं विधान

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.